'तुला पाहते रे'मधील बिपीन टिल्लू उर्फ अभिनेता प्रथमेश देशपांडे 'या' क्षेत्रात करत होता जॉब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 01:12 PM2019-02-17T13:12:34+5:302019-02-17T13:13:02+5:30

'तुला पाहते रे' मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले असून या मालिकेतील बिपीन टिल्लू म्हणजेच अभिनेता प्रथमेश देशपांडेने देखील आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

Tula Pahate Re Fame Bipin Tilloo aka Prathamesh Deshpande was doing 'In This field Job | 'तुला पाहते रे'मधील बिपीन टिल्लू उर्फ अभिनेता प्रथमेश देशपांडे 'या' क्षेत्रात करत होता जॉब

'तुला पाहते रे'मधील बिपीन टिल्लू उर्फ अभिनेता प्रथमेश देशपांडे 'या' क्षेत्रात करत होता जॉब

googlenewsNext

'तुला पाहते रे' मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले असून या मालिकेतील बिपीन टिल्लू म्हणजेच अभिनेता प्रथमेश देशपांडेने देखील आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. प्रथमेशने तुला पाहते रे मालिकेपूर्वी काही हिंदी मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. मात्र बिपीन टिल्लूची भूमिका त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे तो सांगतो. खरेतर तो अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मार्केटिंग क्षेत्रात जॉब करत होता. 

इतकेच नाही तर सुरूवातीला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी त्याच्या घरच्यांचा त्याला पाठिंबा देखील नव्हता. मात्र त्याची अभिनयाप्रती निष्ठा पाहून त्यांनीदेखील त्याला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी परवानगी दिली. अभिनय क्षेत्राच्या प्रवासाबाबत प्रथमेशने सांगितले की, तीन वर्षांपासून मी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यापूर्वी मी मार्केटिंग क्षेत्रात जॉब करत होतो. हा जॉब करत असताना काही कालावधीनंतर मला कंटाळा आला. मग, मी माझे पॅशन म्हणजे अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. आई-बाबांनी सुरूवातीला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी नाही सांगितले. मात्र नंतर त्यांनी दोन वर्षात तू काहीतरी करून दाखवलेस तरच तू या क्षेत्रात काम करू शकतोस.  


२०१६ साली प्रथमेश अभिनयासोबत नोकरीदेखील करत होता. २०१७ साली त्यांनी पूर्ण वेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि 'वो अपना सा', 'ऐसी दिवानगी देखी नही', 'मेरे पापा हिरो हिरालाल' अशा काही हिंदी मालिकांमध्ये डॉक्टर, सीए, अकाउंटंट व वकील अशा भूमिका केल्या. गेल्यावर्षी मेमध्ये त्याने 'तुला पाहते रे' मालिकेसाठी ऑडिशन दिले आणि एक-दोन महिन्यानंतर या मालिकेसाठी निवड झाल्याचे सांगितले. मग लूक टेस्ट झाल्या आणि त्याच्या या प्रवासाला सुरूवात झाली. बिपीन टिल्लूने खूप मोठी ओळख दिल्याचे प्रथमेशने सांगितले.

प्रथमेशने पुढे सांगितले की, 'मी हिंदी मालिकांमध्ये बऱ्याच छोट्या भूमिका केल्या. मात्र माझ्या आयुष्यातील टिल्लूची भूमिका टर्निंग पॉइंट ठरली. टिल्लूची भूमिका मालिकेत खूप मोठी नव्हती. मात्र या मालिकेतील सुरूवातीच्या भागातील एका सीनमध्ये ईशा माझ्याशी बोलते म्हणून टिल्लूला खूप आनंद होतो आणि तो डान्स करतो, असे दाखवले आहे. हा सीन पाहिल्यानंतर माझ्या भूमिकेची खूप चर्चा झाली. लोकांना हा टिल्लू कोण आहे, हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे या मालिकेतील माझा प्रवास वाढविण्यात आला. या भूमिकेमुळे मला झी मराठीच्या उत्सव नात्यांचा शोमध्ये मला एकट्याने परफॉर्म करण्याची संधी मिळाली. 

मला या भूमिकेसाठी बेस्ट कॉमेडी अॅक्टरसाठी नामांकन मिळाले. बिपिन टिल्लू या भूमिकेने मला एवढे काही दिले की मी देवाचे व माझ्या आई- बाबांचे आभार मानतो. त्याचबरोबर अपर्णा केतकर, अतुल केतकर, झी मराठी, अभिजीत गुरू, शर्वरी पाटणकर, शेखर ढवळीकर, गिरीश मोहिते, चंद्रकांत गायकवाड, माझे सहकलाकार, क्रू व आई-बाबा आणि आशुतोष यांचा मी खूप आभारी आहे.'

Web Title: Tula Pahate Re Fame Bipin Tilloo aka Prathamesh Deshpande was doing 'In This field Job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.