The trio of Marathi in Comedy Nights | कॉमेडी नाईट्समध्ये मराठीची तिकडी

कॉमेडी नाईट्स बचाओ या मालिकेत तेजश्री प्रधान, अवधूत गुप्ते आणि प्रथमेश परब झळकणार आहेत. या कार्यक्रमात आतापर्यंत बॉलिवुडमधील अनेक सेलिब्रेटी, छोट्या पडद्यावरच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली आहे. आता विविध प्रादेशिक भाषांमध्ये प्रसिद्ध असणारे कलाकारही या मालिकेत येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तेजश्री, अवधुत आणि प्रथमेश या कार्यक्रमात एका भागात दिसणार आहेत. हार्डी संधू आणि निंजा हे पंजाबी कलाकार तर मोनालिसा, राणी चॅटर्जी आणि खेसरी लाल यादव हे भोजपुरी कलाकारही प्रेक्षकांना हॉट सीटवर पाहायला मिळणार आहेत. 

Web Title: The trio of Marathi in Comedy Nights
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.