Tribute to Mauni Royne Vahili Madhubala | ​मौनी रॉयने वाहिली मधुबालाला श्रद्धांजली

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘लिप सिंग बॅटल’ हा कार्यक्रम ‘लिप सिंक बॅटल’ या गाजलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा भारतीय अवतार आहे. त्यात केवळ बॉलिवूडमधीलच नव्हे तर टीव्ही मालिकांतील लोकप्रिय अभिनेते तसेच प्रसिद्ध खेळाडू आणि अन्य क्षेत्रांतील नामवंत व्यक्तीही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात दोन सेलिब्रिटी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत आणि ते हिंदी चित्रपटांतील गाजलेल्या गाण्यांवर आपले ओठ हलवत (लिप सिंकिंग करत) विनोदी नाट्य़ सादर करत एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. या कार्यक्रमाची फराह खान सर्वस्वी असून अली असगर या कार्यक्रमात तिला साथ देत आहे. हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे. अलीकडेच पार पडलेल्या एका भागात प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय आणि प्रसिद्ध रॅपर रफ्तार यांनी गाजलेल्या गाण्यांच्या बोलांवर लिप सिंगिंग केले. 
मौनी रॉयने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. क्योंकी साँस भी कभी बहू थी, नागिन या मालिकांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. ती अनेक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी झालेली आहे. आता ती गोल्ड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. लिप सिंग बॅटल या कार्यक्रमात झळकायला मिळत असल्यामुळे ती खूपच खूश आहे. या कार्यक्रमाच्या टीममधील एकाने सांगितले, “आम्ही जेव्हा तिच्याकडे या कार्यक्रमाचा प्रस्ताव घेऊन गेलो, तेव्हा त्यावर मौनी खूपच उत्साहित झाली होती. आपण कधी एकदा या कार्यक्रमासाठी चित्रीकरण सुरू करतो, असे तिला झाले होते. या कार्यक्रमात तिने अभिनेत्री मधुबाला यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या त्यांच्या प्रसिद्ध गाण्यावर लिप सिंगिंग केले. या गाण्यासाठी तिने मुघल-ए-आझम या चित्रपटातील मधुबालाच्या पोशाखाप्रमाणेच अनारकलीचा पोशाख घातला होता. तिचा नृत्याविष्कार आणि लिप सिंगिंग हे अपेक्षेपेक्षाही खूप चांगले होते. तिच्या या नृत्याचे फरहा खान आणि प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.”

Also Read : मोहित रैनासोबत फोटोमध्ये दिसणारी 'ती' तरुणी कोण?

Web Title: Tribute to Mauni Royne Vahili Madhubala
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.