Treatment of rupture on the footsteps of Supriya Vinod of the frozen soup | गोठ मालिकेतील ​सुप्रिया विनोद यांच्या दुखऱ्या पायावर रुपल करतेय उपचार

टीव्ही मालिकांमधलं सासू-सुनेचे नाते विळ्या-भोपळ्यासारखे असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेतील कांचन म्हापसेकर आणि राधा यांच्यातले नाते तितके टोकाचे नाही. मात्र, मालिकेच्या सेटवर राधा अर्थात रुपल आपल्या ऑनस्क्रीन सासुबाईंची म्हणजेच सुप्रिया विनोद यांची पूर्ण काळजी घेत आहे. रुपल ही अभिनेत्री असली तरी ती अभिनेत्री व्हायच्याआधी फिजिओथेरपिस्ट होती हे खूपच कमी जणांना माहिती आहे. रुपल फिजिओथेरपिस्ट असली तरी तिला अभिनयाची आवड असल्याने तिचा या क्षेत्रात प्रवेश झाला. त्यामुळे रुपल सुप्रिया विनोद यांच्या दुखऱ्या पायाचे बँडेज करण्यापासून सगळे करत आहे.
मालिकेची टीम ही एखाद्या कुटुंबाप्रमाणेच राहात असते. एकमेकांच्या अडीअडचणींमध्ये पाठीशी उभे राहणे, मदत करणे, काळजी घेणे असे सगळे होत असते. स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेतील सुप्रिया विनोद यांचा पाय काही दिवसांपूर्वी मुरगळला होता. मात्र मालिकेच्या चित्रीकरणाच्या गडबडीत त्यांना पायाकडे नीट लक्ष देता आले नाही आणि पर्यायी पाय सुजला. ते रूपलच्या लक्षात आले. तिने त्यांचा पाय पाहून फ्रॅक्चर नाहीये; तरीही बँडेजिंग करायला हवे असे सांगितले आणि त्याला बँडेजही केले. त्यानंतर सुप्रिया विनोद यांनी डॉक्टरकडे जाऊन चेकअपही केले. त्यात रुपलने सांगितल्याप्रमाणे फ्रॅक्चर नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दुखऱ्या पायानेच सेटवर येणाऱ्या सुप्रिया विनोद यांची काळजी स्वत: रुपल घेत आहे.
'रुपलने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज येथून फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलेले असल्याने तिला काय उपचार करायचे हे बरोबर माहीत आहे. अत्यंत प्रेमाने ती माझी काळजी घेते. फक्त माझीच नाही, तर सेटवर कोणाला त्रास होत असेल, तर रुपल कायमच मदत करते. अत्यंत आपलेपणाने ती सगळ्यांचे करते. आम्ही मालिकेतच नाही, तर प्रत्यक्षातही कुटुंबाप्रमाणेच वावरतो. या कौटुंबिक वातावरणामुळेच काम करायलाही मजा येते,' असं सुप्रिया विनोद यांनी सांगितलं.
आता प्रत्यक्ष मालिकेत राधाच्या आयुष्यात काय घडतंय हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील काहीच भागांत पाहायला मिळणार आहे. 

Also : गोठमधील समीर परांजपेला फॅनकडून मिळाले हे अनोखे गिफ्ट
Web Title: Treatment of rupture on the footsteps of Supriya Vinod of the frozen soup
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.