This track will be seen in the series 'Reality of power existence'? | 'शक्ति अस्तित्व के एहसास की' मालिकेत पाहायला मिळणार हा ट्रॅक?

लोकप्रिय शो शक्ति...अस्तित्व के एहसास कीमध्ये अनेक चढ उतार पहायला मिळत आहे. सध्या चालू असलेल्या ट्रॅकमध्ये, हरमन (विवियन देसना) त्याच्या बालपणीची मैत्रिण जसलिन (अम्रिता प्रकाश) शी लग्न करण्याचे ठरवतो, त्याची आई प्रीतो (काम्या पंजाबी)चा याला विरोध असतो आणि ती तिच्या मुलाने लग्न करू नये म्हणून एक योजना आखते.महासंगम एपिसोड मध्ये, प्रेक्षकांना कलर्स परिवार पहायला मिळणार आहे,जसे की 'उडान' मधील चकोर आणि सूरज (मीरा देवस्थळे व विजयेंद्र कुमेरिया), 'लाडो 2' मधील अनुष्का (अविका गोर), सावित्रीदेवी कॉलेज आणि हॉस्पिटल मधील सांची व वीर (स्वरदा ठिगळे व वरूण कपूर) आणि बेपनाह मधील आदित्य (हर्षद चोप्रा) तसेच बेलनवाली बहू मधील रूपा (क्रिस्टल डिसूझा) प्रीतो ला तिच्या प्लॅन मध्ये मदत करण्यासाठी येणार आहेत, आणि त्यात ते या लग्नात हरमन पुढे जाऊ नये याचे कारण त्याला दाखविणार आहेत.महासंगम एपिसोडमध्ये 'बेलनवाली बहू','बेपनाह' आणि 'दिल से दिल तक' मधील पात्रे संगीत,हळद आणि सर्व लग्नाच्या समारंभात सामील होताना दिसणार आहेत.महासंगम एपिसोड विषयी बोलताना, क्रिस्टल डिसूझा म्हणाली,“महासंगम एपिसोड नेहमीच मजेदार असतात कारण त्यात संपूर्ण कलर्स परिवार एकत्र येत असतो आणि ते चित्रीकरण सुध्दा खूप छान होते आणि शक्तीच्या सेटवरील प्रत्येकाच्या सहभागाने आकर्षक होते.लग्न समारंभातील एका डान्स सिक्वेन्स मधील चित्रीकरणात मी सहभागी झाले होते आणि तो माझ्या साठी खूपच चांगला अनुभव होता आणि मला विश्वास आहे की प्रेक्षक सुध्दा त्याचा आनंद लुटतील.”

सामाजिक नियमांशी लढणाऱ्या आणि किन्नरांना जीवनात आदर मिळेल अशी आशा फुलवणारा 'शक्ति अस्तित्व के एहसास की' मालिका त्याच्या हटके कथानकामुळे सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.सौम्या आणि हरमन यांच्या प्रमुख भूमिका करणाऱ्या लाडक्या रुबिना दिलाइक आणि विवियन देसना यांच्या भूमिकांना वेगवेगळे वळण देणारी ही मालिका आता एका नव्या ट्रॅकवर जाणार आहे.त्यामुळे रसिकांनाही वेगळा ट्वीस्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे.त्यांच्या प्रेमाची परिक्षा घेतानाचा एक ट्रॅक रसिकांना लवकरच पाहायला मिळाला होता.सौम्या अरविंद पूजामध्ये सामील होण्याचा निर्णय घेते. सौम्याला स्विकारणारा हरमन किन्नर समाजाच्या ही जुनी परंपरा प्रकाशात आणणाऱ्या पूजेच्या विरोधात असतो. हा सीन अगदी काटेकोरपणे चित्रीत करण्यासाठी आणि त्यात अस्सलपणा आणण्यासाठी हा प्रसंग चित्रीत करताना यात 70 खरे किन्नर घेतले होते.तसेच या शोच्या निर्मात्यांनी रुबिना साठी एक अतिशय आकर्षक पेहेराव सुध्दा डिझाइन करून घेतला होता.
Web Title: This track will be seen in the series 'Reality of power existence'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.