Title song 'Radha Prem Rangi Rangali' hits on social media! | 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेच्या शीर्षक गीत सोशल मीडियावर हिट!

रसिकांच्या भेटीला येण्यापूर्वीच या मालिकेने रसिकांची पसंती मिळवली असल्याचे पाहायला मिळत आहे.'राधा प्रेम रंगी रंगली' ही मालिका येत्या 24 नोव्हेबारपासून छोट्या पडद्यावर दाखल होत आहे.सध्या मालिकेचे प्रोमो टीव्हीवर झळकत असून 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेद्वारे एक नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, सचित पाटील आणि विणा जगताप. मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल चांगलीच उत्सुकता निर्णाण केली आहे. खरंतर मालिकेचे टायटल साँग जितके चांगले होईल तितकी मालिका रसिकांपर्यंत जास्त पोहचते. 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये राधा आणि प्रेमची प्रेमकथा बघायला मिळणार आहे. मालिकेच्या शीर्षक गीताला सोशल मिडीयावर चांगलीच पसंती मिळत आहे. सहा लाखाहून अधिक प्रेक्षकांनी मालिकेचे शीर्षक गीत बघितले आहे आणि त्यांना ते आवडले देखील आहे.मालिकेचे शीर्षक गीत सुंदर झालेच असून त्याला अजून सुंदरप्रकारे प्रेक्षकांच्या समोर सादर करण्याची जबाबदारी व्हेंटिलेटरसारखा उत्कृष्ट चित्रपट बनविणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित लेखक आणि दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी घेतली होती. गीताचे सुंदर बोल आणि श्रवणीय संगीत रसिकांना साद घालत आहे.

‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच्या माध्यमातून अपघाताने लग्नबंधनात अडकलेल्या प्रेम आणि राधाची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एकासाठी लग्न म्हणजे केवळ एक व्यवहार आहे आणि दुसऱ्यासाठी लग्न म्हणजे संसार ! कसा रंगेल या प्रेमकहाणीचा करार ? युफोरिया प्रॉडक्शन्स निर्मित प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची कथा, “राधा प्रेम रंगी रंगली” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.मालिकेत अभिनेत्री कविता लाड मेढेकर, शैलेश दातार, सचित पाटील, वीणा जगताप, अक्षया गुरव, निरंजन नामजोशी, गौतम जोगळेकर, ऋग्वेदी प्रधान, अपर्णा अपाराजीत प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.राधा ही आजची कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे जिचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे.तर प्रेम व्यवहार चातुर्याने वागणारा, वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळणारा आणि ज्याचं लग्न, कुटुंब, प्रेमं याच्यावर मुळीच विश्वास नाही असा मुलगा आहे. अशी दोन परस्परविरोधी स्वभावाची ही दोन पात्र लग्नबंधनामध्ये अडकतात आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. आता हे लग्न त्यांना का करावे लागले ? कुठल्या परिस्थितीत हे लग्न झाले ? या सगळ्या गोष्टी पाहणे  रंजक ठरणार  आहे.
Web Title: Title song 'Radha Prem Rangi Rangali' hits on social media!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.