टायगर श्रॉफला विल स्मिथला 'ही' गोष्ट शिकवताना वाटायचा संकोच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 09:00 PM2019-05-04T21:00:00+5:302019-05-04T21:00:00+5:30

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'द कपिल शर्मा'शो चा येत्या वीकएंडचा भाग हा खूपच खास असणार आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर २'चे कलाकार टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतरिया या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत. 

Tigar shroff was not comfortable to teach dance to will smith | टायगर श्रॉफला विल स्मिथला 'ही' गोष्ट शिकवताना वाटायचा संकोच

टायगर श्रॉफला विल स्मिथला 'ही' गोष्ट शिकवताना वाटायचा संकोच

googlenewsNext
ठळक मुद्दे'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमा १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'द कपिल शर्मा'शो चा येत्या वीकएंडचा भाग हा खूपच खास असणार आहे. शनिवारी बधाई हो चित्रपटाचे कलाकार, नीना गुप्ता, गजराज राव आणि अमित शर्मा सेटवर येणार आहेत. याच एपिसोडमध्ये गुरु रंधावा आपल्या काही गाजलेल्या गाण्यांवर परफॉर्मदेखील करणार आहे. इतकेच नाही, 'स्टुडंट ऑफ द ईयर २'चे कलाकार टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतरिया या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत. 


टायगर श्रॉफने सांगितले की, “जेव्हा मला हे कळले की विल स्मिथसारख्या बड्या स्टारबरोबर मला काम करायचे आहे, तेव्हा मी खूपच उत्साहित झालो होतो. एक प्रसिद्ध नट, गायक, डान्सर असलेला विल माझ्याकडे शूटिंगदरम्यान माझ्याकडे डान्सच्या स्टेप्स शिकायला यायचा आणि मला त्याला स्टेप्स दाखवाताना संकोच वाटायचा.  


'स्टुडंट ऑफ द ईयर २'मध्ये  टायगर श्रॉफ, अनन्या पांडेतारा सुतारिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोघी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा हा सिनेमा पुनीत मल्होत्राने दिग्दर्शित केला आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमा १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Tigar shroff was not comfortable to teach dance to will smith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.