Thousands sing in this song of your wedding concert! | आपल्या विवाहाच्या संगीत कार्यक्रमात निम्की लावणार या गाण्यावर ठुमके!

छोट्या पडद्यावर सध्या 'निम्की'च्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून हे लग्न भव्य प्रमाणावर साजरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.नुकताच निम्कीचा ‘हळदी समारंभ’ अतिशय थाटात पार पडला. त्यात स्वत: नवरी मुलीने म्हणजे निम्कीने  केलेले डान्स पाहून रसिकही थिरकले असणार असाच होता. विशेष म्हणजे आपल्या विवाहाच्या संगीत सोहळ्यात निम्की 1990 च्या दशकातील सर्व प्रसिध्द लग्नाची गाण्यावर थिरकणारीही आहे. याच निमित्ताने सध्याचे पॉप आणि जॅझच्या दमान्यात जुन्या गाण्यांच्या आठवणींना ऊजाळा देण्याचा प्रयत्न निम्की करताना दिसणार आहे.जुन्या जमान्यातील गाणी आजही आपण ऐकतो.याच  गाण्यांतून विवाहाशी संबंधित वधूच्या सर्व भावना व्यक्त होतात, असे तिचे मत आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातील ‘मेरे ख्वाबों में जो आए’ आणि अर्थातच ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यांवर ती बेधुंद होऊन थिरकणार आहे कारण एखाद्या भव्य लग्नाची सगळ्या भावना या गाण्यांतून व्यक्त होते असे निम्कीचे मत आहे.90 च्या दशकातील गाजलेल्या गाण्यांमुळे निम्कीचा संगीत कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.निम्कीची भूमिका साकारणारी भूमिका गुरुंग म्हणाली, “संगीताशिवाय कोणताही विवाहसोहळा अपूर्ण असतो आणि त्यामुळे ऑनस्क्रीन रंगणा-या निम्कीच्या विवाह सोहळ्यातही रसिकांना अगदी खुराखु-या संगीत कार्यक्रमाचा अनुभव देणारा ठरणार आहे.यासाठी निम्कीने म्हणजे भूमिकाने  दोन दिवस डान्सचा सराव केला. खुप मेहनतीने तिने या गाण्याची प्रत्येक स्टेप शिकून घेतली आहे.त्यामुळे निम्कीचाही विवाह सोहळा पाहणे रंजक ठरणार आहे.

Also Read:‘निम्की मुखिया’मध्ये लोकप्रिय कलाकार मोनालिसाचे मादक आयटम गीत!

हे लग्न अतिशय भव्य प्रमाणावर आणि थाटामाटात पार पाडण्यासाठी निर्मात्यांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही.आता निम्की आणि बब्बू सिंह यांच्या लग्नाला एक ग्लॅमरचे वलय लाभावे, यासाठी मोनालिसा ही मादक नर्तिका आपले एक मादक नृत्य निम्कीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात सादर करणार आहे.टॉलीवूडमधली एक विख्यात अभिनेत्री असलेली मोनालिसा ही आपल्या ठुमक्यांसाठी प्रसिध्द आहे. या मालिकेचे कथानक बिहारमध्ये घडत असल्याने मोनालिसाचे नृत्य त्यात अचूक भर टाकेल. ‘आ रे प्रीतम प्यारे’ या गाण्यावर मोनालिसा नृत्य करणार आहे. 
Web Title: Thousands sing in this song of your wedding concert!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.