'This' thing is done by Surabhi Hande in Navratri | सुरभी हांडे नवरात्रीत करते 'ही' गोष्ट
सुरभी हांडे नवरात्रीत करते 'ही' गोष्ट

ठळक मुद्देनवरात्रमध्ये सगळीकडे उत्साहाच वातावरण असते

कलर्स मराठीवरीललक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकरने नवरात्री बद्दल काही गोष्टी सांगितल्या... गणपती नंतर येणारा आणि तोही उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे नवरात्रौत्सव...नवरात्रात देवीची नऊ दिवस उपासना केली जाते...ह्या नऊ दिवसात सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते...श्रद्धेने उपवास धरून जप करत  सेवेत रुजू होतात...नऊ दिवसांच्या नऊ माळा असतात, घटस्थापना करतात. मी वेळ काढून देवीच्या
दर्शनाला दर नवरात्री मध्ये जाते. मला अजून आठवते पूर्वी जिथे गरबा आणि डान्स संबंधीत स्पर्धा आयोजित केल्या जायच्या तेव्हा मी तिथे आवर्जून जायचे तिथे मला बरीच बक्षीस देखील मिळाली आहेत. मी लहानपणापासून डांस शिकते त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा डान्स करायला आवडते. कुठल्याहीप्रकारचे नृत्य हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. तसेच मालिकेतील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे नवरात्रीमध्ये ९ दिवस उपवास ठेवते. इतक्या व्यस्त शेड्युल मध्ये सुरभी हा उपवास
मनोभावे करते.


समृद्धीने नवरात्रीबद्दल सांगताना पुढे म्हणाली - शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा,  स्कंदमाता,कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री...अशी ही देवींची रूप आहेत...या नऊ दिवसात नऊ वेगवेगळे रंग आहेत .... उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत....महिला वर्ग  हे रंग फॉलो करताना दिसतात... नवरात्रात आपण बघतो की देवीच्या सुबक अश्या मूर्ती आणल्या जातात....त्याचबरोबर गरबा, दांडिया, भोंडला खेळला जातो...मला स्वत:ला गरबा खेळायला खूप आवडते… गरबा आणि भोंडला मध्ये देखील स्पर्धा
आयोजित केल्या जातात. सगळीकडे उत्साहाच वातावरण बघायला मिळतं....त्यामुळे मला नवरात्र खूप आवडते.


Web Title: 'This' thing is done by Surabhi Hande in Navratri
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.