छोट्या पडद्यावरील 'ही' फेव्हरेट सूनबाई करतेय कमबॅक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 11:29 AM2019-07-04T11:29:22+5:302019-07-04T11:32:33+5:30

छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत.

Tejashree pradhan back on small screen | छोट्या पडद्यावरील 'ही' फेव्हरेट सूनबाई करतेय कमबॅक 

छोट्या पडद्यावरील 'ही' फेव्हरेट सूनबाई करतेय कमबॅक 

googlenewsNext
ठळक मुद्देती महाराष्ट्राची लाडकी व आदर्श सून बनली आहे.

छोट्या पडद्या असो किंवा रुपेरी पडद्या दोन्ही ठिकाणी तिने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. आम्ही बोलतोय, तेजश्री प्रधानबाबत विविध सिनेमातील तिच्या  भूमिका रसिकांना भावल्या आहेत. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. इतकंच नव्हे तर ती महाराष्ट्राची लाडकी व आदर्श सून बनली.

त्यानंतर तेजश्रीने चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला. पण तेजश्रीच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. तेजश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळणार आहे. झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या आगामी मालिकेत तेजश्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसतील. दिग्गज कलाकारांचा मेळ असलेली ही मालिका नक्कीच रंजक असेल यात शंकाच नाही. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि या प्रोमोमुळे प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

तेजश्री प्रधानला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहणं औस्त्युक्याच ठरेल. हि मालिका २२ जुलै पासून रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याचाच अर्थ 'तुला पाहते रे' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.   

Web Title: Tejashree pradhan back on small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.