'Tarak Mehta's Reverse Chakra' Tarakbhai, meaning Shailesh Lodha is a childish figure | 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या तारकभाई म्हणजेच शैलेश लोढा बालपणीचा अंदाज

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील तारक ही भूमिका साकारणारे अभिनेता शैलेश लोढा यांचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोकडे पाहून रसिकांना खळखळून हसवणा-या तारक मेहता का उल्टा चष्मामधील हे तारकभाई आहेत हे कुणीही ओळखू शकणार नाही. शैलेश लोढा यांचा हा बालपणीचा फोटो आहे. या फोटोकडे लक्षपूर्वक पाहिल्यास हा फोटो मालिकेतल्या तारक मेहता यांचा आहे हे स्पष्ट होईल. शैलेश लोधा यांचा हा अगदी तरुण वयातील फोटो आहे. मालिकेतील जेठालालसाठी फायरब्रिगेड असणारे तारक रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सुरु झाल्यापासून आपल्या भूमिकेने शैलेश लोढा यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील भूमिकेसोबतच प्रसिद्ध कवी, कॉमेडियन आणि लेखक अशी शैलेश लोढा यांची ओळख आहे. विज्ञान विषयाची पदवी घेतलेल्या शैलेश लोढा यांनी मार्केटिंग या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लेखन आणि रसिकांना खळखळून हसवण्याच्या छंदाने शैलेश लोढा यांना नवी ओळख मिळवून दिली. हास्य कवी म्हणून ते रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. शैलेश लोढा यांनी आजवर चार पुस्तकं लिहली आहेत. 'दिलजले का फेसबुक स्टेटस' हे शैलेश लोढा यांचं पुस्तक विशेष लोकप्रिय ठरले. भारतात आपल्या कवितांच्या जोरावर लाखो रुपयांची कमाई करणा-या मोजक्या कवींमध्ये शैलेश लोढा यांची गणना होते. शैलेश लोढा यांचं रियल लाइफमध्ये एका लेखिकेशी लग्न झालं आहे. त्यांची पत्नी स्वाती लोढा या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी मॅनेजमेंट या विषयावर लेखन केले आहे. स्वाती यांनी लिहलेल्या पुस्तकांना वाचकांची पसंती मिळाली आहे. त्यांच्या पुस्तकामुळे अनेक नागरिकांचं जीवन बदललं आहे. शैलेश लोढा यांच्या पत्नीने मॅनेजमेंटच्या जगतात अतुलनीय योगदान देण्यासह सामाजिक कार्यांमध्येहरी भरीव योगदान दिले आहे. शैलेश आणि स्वाती यांना स्वरा नावाची एक लेकही आहे.

Also Read:‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील चंपकचाचाचे रिअल फॅमिली फोटो!

Web Title: 'Tarak Mehta's Reverse Chakra' Tarakbhai, meaning Shailesh Lodha is a childish figure
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.