तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत हा कलाकार दिसणार डॉ. हाथीच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 04:45 PM2018-07-20T16:45:45+5:302018-07-20T16:58:12+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत डॉ. हाथीच्या भूमिकेत कोणत्याही कलाकाराला निर्मात्यांनी घेऊ नये असे प्रेक्षकांचे म्हणणे होते. पण शो मस्ट गो ऑन असे म्हटले जाते. त्यामुळे डॉ. हाथी यांच्या भूमिकेसाठी निर्माते काही कलाकारांचा विचार करत आहे.

Tarak Mehta's reverse chakra series will be seen in this artist Role of Elephants | तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत हा कलाकार दिसणार डॉ. हाथीच्या भूमिकेत

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत हा कलाकार दिसणार डॉ. हाथीच्या भूमिकेत

googlenewsNext

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत डॉ. हाथी यांची भूमिका कवी कुमार आझाद साकारत होते. त्यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला आहे. कवी कुमार आझाद यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी त्यांना डॉ. हाथी या भूमिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. प्रेक्षक त्यांना डॉ. हाथी या नावानेच ओळखू लागले होते. त्यांच्याशिवाय प्रेक्षक या मालिकेचा विचार देखील करू शकत नाही. त्यामुळे डॉ. हाथीच्या भूमिकेत कोणत्याही कलाकाराला निर्मात्यांनी घेऊ नये असे प्रेक्षकांचे म्हणणे होते. पण शो मस्ट गो ऑन असे म्हटले जाते. त्यामुळे डॉ. हाथी यांच्या भूमिकेसाठी निर्माते काही कलाकारांचा विचार करत आहे. डॉ. हाथी ही भूमिका मालिकेत आता कोण साकारणार असा प्रश्न सगळ्याच टीमला पडला आहे.
कवी कुमार आझाद यांच्याआधी या मालिकेत डॉ. हाथी ही भूमिका निर्मल सोनी साकारत होते. निर्मल यांनी 2008 मध्ये मालिका सोडल्यामुळेच कवी कुमार आझाद यांना ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सुरुवातीपासून निर्मलच डॉ. हाथी यांची भूमिका साकारत असला तरी प्रेक्षकांना या भूमिकेत कवी कुमार आझाद अधिक भावले होते. आता त्यांच्या निधनानंतर ही भूमिका साकारण्यासाठी पुन्हा निर्मल सोनीचा विचार करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. 
निर्मल सोनी प्रमाणेच आणखी एका अभिनेत्याचा विचार तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हाथी या भूमिकेसाठी केला जात आहे. सतिश कौशिक यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ते उत्कृष्ट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक आहेत. त्यांनी सुमीत संभाल लेगा, मे आय कम इन मॅडम यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. आता डॉ. हाथीची भूमिका साकारण्यासाठी त्यांचा विचार केला जात असल्याचे म्हटले जात आहे. 


 

Web Title: Tarak Mehta's reverse chakra series will be seen in this artist Role of Elephants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.