तारक मेहता का उल्टा चष्मामधील अय्यरला खऱ्या आयुष्यात अजून मिळाली नाही बबिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:37 PM2018-08-01T12:37:36+5:302018-08-01T12:49:39+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अय्यरची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत ही भूमिका तनुज महाशब्दे साकारत आहे. या मालिकेत तनुज दाक्षिणात्य भूमिका साकारत आहे. त्याची हिंदी बोलण्याची ढब देखील एखाद्या दाक्षिणात्य माणसाप्रमाणेच आहे. त्यामुळे तो खऱ्या आयुष्यात देखील दाक्षिणात्य असेल असेच सगळ्यांना वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात तनुज हा महाराष्ट्रीयन आहे.

Tarak mehta ka ooltah chashmah iyer aka Tanuj Mahashabde is still single | तारक मेहता का उल्टा चष्मामधील अय्यरला खऱ्या आयुष्यात अजून मिळाली नाही बबिता

तारक मेहता का उल्टा चष्मामधील अय्यरला खऱ्या आयुष्यात अजून मिळाली नाही बबिता

googlenewsNext

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेला नुकतेच दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेला आज दहा वर्ष झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अय्यरची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत ही भूमिका तनुज महाशब्दे साकारत आहे. या मालिकेत तनुज दाक्षिणात्य भूमिका साकारत आहे. त्याची हिंदी बोलण्याची ढब देखील एखाद्या दाक्षिणात्य माणसाप्रमाणेच आहे. त्यामुळे तो खऱ्या आयुष्यात देखील दाक्षिणात्य असेल असेच सगळ्यांना वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात तनुज हा महाराष्ट्रीयन आहे. तो लहानाचा मोठा इंदौरमध्ये झालेला आहे. तो कामाच्या निमित्ताने अनेक वर्षांपूर्वी मुंबईत आला. या मालिकेत बबिता ही त्याची पत्नी असून ती खूपच सुंदर आहे असे आपल्याला पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का खऱ्या आयुष्यात तनुजचे लग्न झालेले नाही. या मालिकेत पोपटलालचे लग्न झालेले नसून तो लग्नासाठी मुली शोधत असल्याचे दाखवण्यात येते. पण पोपटलालची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या श्याम पाठकचे लग्न झालेले असून त्याला तीन मुले देखील आहेत. पण तनुजचे अजून लग्न झालेले नाही. तनुज खऱ्या आयुष्यात त्याच्या आयुष्यातील बबिता शोधत आहे. याविषयी तो सांगतो, मी खऱ्या आयुष्यात अद्याप अविवाहित आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या फॅन्सना पोपटलालच्या लग्नाची चिंता लागलेली असते. पण खऱ्या आयुष्यातील पोपटलाल अय्यर आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. 

Web Title: Tarak mehta ka ooltah chashmah iyer aka Tanuj Mahashabde is still single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.