लग्न झाल्यानंतर ही अभिनेत्री थेट पोहोचली पबमध्ये, लेहंग्यामध्येच थिरकली डान्स फ्लोअरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:27 PM2019-04-19T16:27:54+5:302019-04-19T16:29:13+5:30

तान्याचे नुकतेच लग्न झालं असून ती लग्नात खूपच सुंदर दिसत होती. तिने लग्नात इतर वधुंप्रमाणे लाल रंगाचा लेहंगा न घालता गुलाबी रंगाचा लेहंगा घालणे पसंत केला होता आणि त्यावर कुंदनची ज्वेलरी घातली होती.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Tanya Gupta breaks stereotypes by dancing at a pub soon after her wedding | लग्न झाल्यानंतर ही अभिनेत्री थेट पोहोचली पबमध्ये, लेहंग्यामध्येच थिरकली डान्स फ्लोअरवर

लग्न झाल्यानंतर ही अभिनेत्री थेट पोहोचली पबमध्ये, लेहंग्यामध्येच थिरकली डान्स फ्लोअरवर

ठळक मुद्देतान्याने लग्न केल्यानंतर इतर वधुप्रमाणे घर न गाठता थेट पब गाठला आणि त्या लेहंगामध्येच डान्स फ्लोअरवर ताल धरला. तिनेच इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. तिने तिचा पबमध्ये नृत्य करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत. या मालिकेतील पोपटलाल तर प्रेक्षकांचा चांगलाच लाडका आहे. या मालिकेत पोपटलालचे लग्न कधी होणार हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडलेला असतो. 

आजवर मालिकेत अनेकवेळा त्याचे लग्न आता जमणार असे वाटत असतानाच लग्नात विघ्न येते आणि त्याचे लग्न मोडते. या मालिकेत काही भागांसाठी आपल्याला तान्या गुप्ता ही अभिनेत्री पाहायला मिळाली होती. तान्या आणि पोपटलालचे लग्न होणार होते. पण काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. तान्या या मालिकेत काहीच भागांसाठी असल्याने तिला तितकीशी लोकप्रियता मिळाली नव्हती. पण तान्या आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

तान्याचे नुकतेच लग्न झालं असून ती लग्नात खूपच सुंदर दिसत होती. तिने लग्नात इतर वधुंप्रमाणे लाल रंगाचा लेहंगा न घालता गुलाबी रंगाचा लेहंगा घालणे पसंत केला होता आणि त्यावर कुंदनची ज्वेलरी घातली होती. या लेहंगामध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. तान्याचा हा प्रेमविवाह असून तिच्या पतीने तिला मालदिवमध्ये रोमँटिक अंदाजात प्रपोज केले होते. प्रपोज करतानाचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट देखील केला होता. 

तान्याने लग्न केल्यानंतर इतर वधुप्रमाणे घर न गाठता थेट पब गाठला आणि त्या लेहंगामध्येच डान्स फ्लोअरवर ताल धरला. तिनेच इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. तिने तिचा पबमध्ये नृत्य करतानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, मी माझे लग्न झाल्यानंतर पबमध्ये लेहंगा घालून प्रवेश केला, त्यावेळी सगळेच माझ्याकडे आश्चर्याने पाहात होते. ठरवून न करता केलेल्या गोष्टी या नेहमीच खूप चांगल्या होतात आणि त्या आठवणी आयुष्यभर टिकून राहातात. 

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Tanya Gupta breaks stereotypes by dancing at a pub soon after her wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.