Swords training for the series | प्राजक्ताने मालिकेसाठी घेतले घोडेस्वारीचे प्रशिक्षण

मालिकेच्या गरजेनुसार कलाकारांनेहमीच विविध गोष्ट शिकत असतात. नुकतेच 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेसाठी प्राजक्ता गायकवाड हिने घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले आहे. शूटिंगच्या 15 दिवस आधी प्राजक्ता हिने घोडस्वारीचे योग्य प्रशिक्षण मिळाले. ऐवढेच नाही तर तिने आठ दिवस तिने तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. प्राजक्ता या मालिकेत येसू बाईंची भूमिका साकारते आहे. तलवारबाजी शिकताना प्राजक्ताला अनेक छोट्या-मोठ्या दुखापती देखील झाल्या. मालिकेसाठी तिचे लूक टेस्ट झाल्यानंतर तिने लगेच तिने लगेचच तलवार बाजीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. 

हि मालिका संभाजी राजांच्या आयुष्यावर आधारित आहे. डॉ.  अमोल कोल्हेने या मालिकेत  संभाजी राजांच्या भूमिकेत दिसतायेत. छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यावर दृष्टीक्षेप टाकला तर एक बाब प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे लहानपणापासूनच अनेक चढ-उतार त्यांच्या आयुष्यात आले. वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचे छत्र हरवले. मात्र आजी जिजाऊसाहेबांच्या सावलीत स्वराज्याचे बाळकडू त्यांना मिळाले. अवघ्या नवव्या वर्षी मिर्झाराजांच्या गोटात जाऊन स्वराज्यासाठी मोगल मनसबदार झाले. दहाव्या वर्षी आग्र्याला शहेनशहा औरंगजेबाच्या दरबारात आपल्या बाणेदारपणाने भल्याभल्यांना चकित केले. आग्र्याहून सुटकेनंतर मथुरा ते राजगड प्रवास एकट्याने केला. पण युवराजपदी शंभूराजे विराजमान झाले आणि राजारामांच्या जन्मानंतर सुरू झालेल्या कुटुंबकलहाने डोके वर काढले. कारस्थानी कारभाऱ्यांनी स्वार्थासाठी महाराणी सोयराबाईंच्या मातृसुलभ भावनेला फुंकर घातली. आरोप आणि बदनामीची धुळवड शंभूराजांच्या आयुष्यात सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य आणि शंभूराजे दोन्ही पोरके झाले. घरातील वादळ सुरू असतानाच स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, आदिलशहा हे सारे शत्रू एकाचवेळी सज्ज झाले. या मालिकेचे लेखन प्रताप गंगावणे यांनी केले असून मालिकेची निर्मिती डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली राव आणि पिंकू बिस्वास यांनी केली आहे
 
Web Title: Swords training for the series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.