Swapnil Joshi NO Returning to the small screen through the program Yehry with Swapnil | ​स्वप्निल जोशीचे NO. 1 यारी विथ​ स्वप्निल या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन

स्वप्निलला आज मराठीतील सुपरस्टार असे संबोधले जाते. ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘भिकारी’ यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. सध्या तो ‘मुंबई-पुणे-मुंबई-३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. स्वप्निलने छोट्या पडद्यापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यामुळे छोटा पडदा हा त्याच्यासाठी नेहमीच खास आहे. त्याने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक रिअॅलिटी शो चा तो हिस्सा बनला आहे. स्वप्निलने गेल्या वर्षी कोण होईल मराठी करोडपती या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन केले होते. स्वप्निलचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमातील स्वप्निलच्या सूत्रसंचालनाचे चांगलेच कौतुक झाले होते. आता पुन्हा एकदा स्वप्निल छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार आहे. 
कोण होईल मराठी करोडपती हा कार्यक्रम कलर्स मराठी या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आता याच वाहिनीवर NO. 1 यारी विथ​ स्वप्निल हा कार्यक्रम सुरू होत असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल जोशी करणार आहे. हा कार्यक्रम १८ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो स्वप्निलने त्याच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंट वरून शेअर करत या कार्यक्रमाबाबत त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोवरून हा कार्यक्रम फ्रेंडशिपवर आधारित असल्याचे आपल्याला कळत आहे. 
स्वप्निलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. पुढे ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक त्याने दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात स्वप्निलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला. या कार्यक्रमातील त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले.

Also Read : ​स्वप्निल जोशीच्या मुलाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?
Web Title: Swapnil Joshi NO Returning to the small screen through the program Yehry with Swapnil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.