Swapnil AK dream! | स्वप्निल एके स्वप्निल !

छोट्या पडद्यावर कौन बनेगा करोडपतीच्या या शोच्या माध्यमातून ''देवीयो और सज्जनो'' म्हणत बिग बी अमिताभ बच्चन यांनी धुमाकुळ घातला होता. त्यानंतर शाहरुख  खान याला हे कौन बनेगा करोडपती या शोचे शुत्रसंचालन करायचा मोह आवरू शकला नव्हता. मात्र शाहरुख खान अमिताभ बच्चन प्रमाणे रसिकांचे मनं जिंकण्यात अयस्वी ठरला. कौन बनेगा करोडपतीची लोकप्रियता पाहता मराठीतही त्याच धरतीवर 'कोण होईल मराठी करोडपती' हा शो सुरू करण्यात आला. या शोचे दोनही सिझनचे सुत्रसंचालन सचिन खेडेकर यांनीच केले. आता पुन्हा एकदा 'कोण होईल मराठी करोडपती-पर्व 3' रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. मात्र यावेळी मराठी माणसाला करोडपती बनवण्याची जबाबदारी मराठी सिनेसृष्टीचा चाॅकलेट बाॅय अभिनेता स्वप्नील जोशी पार पाडणार आहे. विशेष म्हणजे स्वप्नील जोशी पहिल्यांदाच कोणतीही व्यक्तीरेखा न साकारता फक्त आणि फक्त स्वप्नील जोशी म्हणून रसिकांच्या भेटीला येणार आहे. याआधी विविध मालिका, नाटक, सिनेमांमध्ये स्वप्नील विविध भूमिकांमधून रसिकांच्या भेटीला आलाय. मात्र कोण होईल मराठी करोडपती-पर्व 3 या गेम शोच्या निमित्ताने स्वप्नील पहिल्यादांच स्वप्नील म्हणून रसिकांसमोर येतोय. या नव्या भूमिकेसाठी सज्ज असल्याचे स्वप्नीलनं म्हटलंय. या शोमुळे थेट रसिकांशी संवाद साधता येणार असल्याचा आनंद त्यानं व्यक्त केलाय. एक सामान्य माणूस म्हणून रसिकांना भेटण्यात जी मजा आहे ती एक अभिनेता म्हणून नाही असंही त्यानं स्पष्ट केलंय. 

 

Web Title: Swapnil AK dream!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.