Swami Omla, Delhi crime bribe hacked !! | स्वामी ओमला दिल्ली क्राइम ब्रॅँचने ठोकल्या बेड्या !!

‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोचा सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक ठरलेल्या स्वयंघोषित बाबा स्वामी ओम यास दिल्लीच्या इंटर स्टेस सेल क्राइम ब्रॅँचने अटक केली आहे. स्वामी ओमला भजनपुरा परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. स्वामी ओमला न्यायालयाने उद्घोषित अरोपी (पीओ) म्हणून घोषित केल्यानंतर क्राइम ब्रॅँचने त्यास अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात स्वामी ओमला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले होते; मात्र लोकांनी कार्यक्रमादरम्यान त्याला चांगलाच चोप दिला होता. 

ही घटना दिल्लीतील विकास नगर स्थित सत्यम वाटिकामध्ये आयोजित नथुराम गोडसे जयंती कार्यक्रमादरम्यान घडली होती. या कार्यक्रमात स्वामी ओमला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानेच लोकांचा पारा चढला होता. अशातही स्वामी ओमने त्याचा तोरा कायम ठेवला. याच कारणामुळे संतापलेल्या लोकांनी त्याला चोप दिला. स्वत:ला साधू-संत संबोधणाºया स्वामी ओम ‘बिग बॉसच्या सीजन १०’ मुळे चर्चेत आहे. वादग्रस्त वक्तव्य आणि बेशिस्त वर्तणुकीमुळे तो प्रचंड वादग्रस्त ठरत आहे. याव्यतिरिक्त स्वामी ओम ऊर्फ स्वामी विनोदा आनंद झा याच्याविरोधात दिल्लीत सायकल चोरीचा आरोपही आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ११ सायकली चोरल्याचा गुन्हा स्वामी ओमवर दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याचाच सख्खा भाऊ प्रमोद यांनी त्याच्यावर सायकल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

एवढेच नव्हे, तर दिल्लीतील विविध भागांमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बळजबरीने कब्जा करणे, चोरी, मसाज पार्लर, ब्लॅकमेलिंग, आर्म्स अ‍ॅक्ट आणि फसवणूक अशा स्वरूपाचे हे गुन्हे आहेत. 
Web Title: Swami Omla, Delhi crime bribe hacked !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.