सुयश टिळक आणि सुरुची अडारकर या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा येणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 03:50 PM2019-03-01T15:50:36+5:302019-03-01T15:56:11+5:30

सुयश आणि सुरुची यांच्यातला दुरावा संपला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

suyash tilak and suruchi adarkar come together for zee yuva's ek ghar mantarlela | सुयश टिळक आणि सुरुची अडारकर या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा येणार एकत्र

सुयश टिळक आणि सुरुची अडारकर या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा येणार एकत्र

googlenewsNext
ठळक मुद्देझी युवा वरील 'एक घर मंतरलेलं' या नव्या मालिकेमध्ये ते दोघे दिसणार आहेत. घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाच ओढून घेतं... हे वाक्य जेवढं गूढ आहे तशीच ही मालिका सुद्धा आहे.या मालिकेत सुरुची एका न्यूज रिपोर्टरची भूमिका साकारणार असून सुयशच्या व्यक्तिरेखेबद्दल अजूनही गुप्तता बाळगण्यात आली आहे. पण सुयशची भूमिका देखील तितकीच दमदार आणि वेगळी असेल यात शंकाच नाही.

छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सुरुची अडारकर. 'का रे दुरावा' या मालिकेत प्रेक्षकांना सगळ्यात पहिल्यांदा ही जोडी पाहायला मिळाली होती. या मालिकेतील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील जय आणि आदिती प्रेक्षकांना आपल्यामधीलच एक वाटायला लागले होते. ही मालिका संपून आज अनेक महिने झाले असून या मालिकेला आणि या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षक मिस करत आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर त्या दोघांची जोडी आपल्याला एका नाटकात पाहायला मिळाली होती. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर काहीच महिन्यात त्यांचं 'स्ट्रॉबेरी' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले. या नाटकातील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांना भावली होती. पण आता ते कधी एकत्र काम करणार याची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यांच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे की, सुयश आणि सुरुची यांच्यातला दुरावा संपला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

झी युवा वरील 'एक घर मंतरलेलं' या नव्या मालिकेमध्ये ते दोघे दिसणार आहेत. घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाच ओढून घेतं... हे वाक्य जेवढं गूढ आहे तशीच ही मालिका सुद्धा आहे. काहीतरी अनपेक्षित, गूढ आणि रहस्यमय अशी 'एक घर मंतरलेलं' ही नवीन मालिका ४ मार्चपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ९:३० वाजता झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सुरुची एका न्यूज रिपोर्टरची भूमिका साकारणार असून सुयशच्या व्यक्तिरेखेबद्दल अजूनही गुप्तता बाळगण्यात आली आहे. पण सुयशची भूमिका देखील तितकीच दमदार आणि वेगळी असेल यात शंकाच नाही. तूर्तास ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय आणि या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेचे वेध लागले असून ते या मालिकेची आतुरतेने वाट बघत आहेत. ही वेगळ्या धाटणीची मालिका आणि त्यातील सुरुची आणि सुयशची अनोखी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.

Web Title: suyash tilak and suruchi adarkar come together for zee yuva's ek ghar mantarlela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.