Surprising to Bharti Singh's 'Dance Diva' | 'डान्स दिवाने'मध्ये भारती सिंग देणार प्रेक्षकांना सरप्राईज

'डान्स दिवाने ने' सहभागी झालेल्या स्पर्धकांनी डान्सविषयी दाखविलेल्या आवडीने प्रेक्षक भारवून गेले आहेत. आगामी एपिसोडमध्ये हास्याची रेलचेल असणार आहे आणि त्यात टेलिव्हिजन वरील प्रख्यात कॉमेडियन भारती सिंग शोमध्ये अतिथी म्हणून येणार आहे. यात ती किशन नावाच्या एका स्पर्धकासोबत अतिशय आकर्षक डान्स सादर कऱणार आहे. लहू मुँह लग गया या गाण्यावरील त्यांच्या परफॉर्मन्सवर सर्वांचे डोळे खिळून राहिले होते आणि संपूर्ण टीम निःशब्द झाली होती.

सर्व परीक्षक, विशेषतः माधुरी दिक्षीत त्यांच्या परफॉर्मन्सच्या प्रत्येक तालाचा आस्वाद घेताना दिसत होत्या. भारतीने नेहमीप्रमाणे तिची आकर्षकता पसरविली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणले. शो विषयी बोलताना भारतीने सांगीतले की तिला आधी डान्सरच व्हायचे होते. “मला माझ्या जीवनात डान्सरच व्हायचे होते. डान्सिंग ही माझी नेहमीच आवड राहिली आहे. वेगवेगळ्या वयोगटाचे लोक त्यांची आवड दाखविण्यासाठी एकत्र येतात असा शो पाहणे खरोखर विस्मयकारक आहे. हा उत्साह आणि मला येथे जी एनर्जी दिसली त्याचे मला कौतुक वाटते.” आधीच्या डान्स शो मधील फाफटपसारा दूर ठेवत. या वैशिष्ट्यपूर्ण स्वरुपाच्या शो मधून डान्सची अतिशय आवड असणाऱ्यांना डान्सचे कौशल्य दाखविण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला आहे. मुले, तरुण आणि प्रौढ अशा 3 वयोगटातील सर्व स्पर्धकांना त्यांच्या स्वतःच्या श्रेणीत त्यांचे कौशल्य दाखविता येणार आहे. प्रत्येक श्रेणीतील एक असे तीन स्पर्धक भारताच्या एकमेव डान्स दिवाने साठी लढत देतील.

काही दिवसांपूर्वी भारती आणि राजीव खंडेलवाल  त्यांचा आगामी शो 'जज्बात'चे शूटिंग करत असताना तेव्हा अचानकच असे काही घडले की, सर्वांची एकच तारांबळ उडाली. राजीव खंडेलवाल अचानक बेशुद्ध पडले. त्यांची स्थिती बघून भारती सिंग तर खूपच घाबरून गेली होती. तिने आरडाओरड करीत मदतीसाठी इतरांना बोलाविण्यास सुरुवात केली. भारतीची आरडाओरड ऐकून काही क्षणांतच सेटवर लोकांची गर्दी झाली. मात्र अचानकच राजीव खंडेलवाल उठून उभे राहिल्यामुळे भारतीला आणखीनच धक्का बसला. राजीवने भारतीला म्हटले की, मी तुझ्याशी चेष्टा करीत होतो. मात्र तोपर्यंत भारती प्रचंड घाबरून गेली होती. तिला राजीवच्या या विचित्र मस्करीवर काय बोलावे याबाबतचे शब्दच नव्हते.

Web Title: Surprising to Bharti Singh's 'Dance Diva'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.