Surbhya Jyoti in 'This Pyaar Ko ...' plays the guest of honor | ‘इस प्यार को…’मध्ये सुरभि ज्योती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत

सुरभी ज्योती 'कबूल है' या मालिकमुळे नावारूपाला आली. या मालिकेनंतर नुकतीच ती 'इश्कबाज' या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. यानंतर आता ती 'कोई लौट के आया है' या मालिकेत झळकली होती.‘कौई लौट के आया है’ ही मालिका संपल्यामुळे त्यात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरभि ज्योती सध्या फ्रि टाईम एन्जॉय करत आहे. मात्र सुरभीला बिझी राहायला आवडतं त्यामुळे ती नेहमीच काम करण्यासाठी खूप उत्सुक असते. आता सुरभी लवकरच 'इस प्यार को क्या नाम दूँ' या मालिकेत एक छोटी परंतु प्रभावी भूमिका रंगविणार असल्याचे कळतंय. सेटवरील सूत्रांनी सांगितले, “वास्तविक ‘इस प्यार को…’ मालिकेतील चांदनीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी प्रथम सुरभीचीच निवड केली होती. पण काही कारणांमुळे सुरभीला ही भूमिका स्वीकारता आली नव्हती. मालिकेत शिवानी तोमर साकारीत असलेली चांदनीची व्यक्तिरेखा सुरभीला पसंत पडली असून मालिकेच्या प्रदर्शनाच्या वेळी त्या दोघी गप्पांमध्ये रमून गेलेल्या दिसत होत्या. परंतु निर्मात्यांना सुरभीला या मालिकेत छोटी का होईना भूमिका द्यायची असून यावर विचार सुरू आहे. छोट्या पडद्यावरील 'इस प्यार को क्या नाम दूँ' ही मालिका सुपरहिट ठरली होती. मालिकेची कथा आणि यातील कलाकार यांना आजही रसिकांच्या मनात अढळ स्थान आहे. मालिकेतील 'अरनवसिंह रायजादा' ही या मालिकेतील भूमिका विशेष गाजली होती. बिझनेसमन अरनवसिंह 'रायजादा' ही भूमिका अभिनेता बरुण सोबती याने साकारली होती.आता सुरभीच्या एंट्रीने ही मालिका रंजक वळण घेणार आहे. 

Web Title: Surbhya Jyoti in 'This Pyaar Ko ...' plays the guest of honor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.