सुपरस्टार शिवांश येतोय तुमचे मन जिंकायला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 04:29 PM2018-12-10T16:29:13+5:302018-12-10T16:29:40+5:30

स्टार प्लसवरील सर्वांची लाडकी मालिका 'इश्कबाज'मध्ये आता एका पिढीची झेप घेण्यात येणार आहे.

Superstar is getting a Shivshansh coming to win your mind | सुपरस्टार शिवांश येतोय तुमचे मन जिंकायला

सुपरस्टार शिवांश येतोय तुमचे मन जिंकायला

googlenewsNext

स्टार प्लसवरील सर्वांची लाडकी मालिका 'इश्कबाज'मध्ये आता एका पिढीची झेप घेण्यात येणार आहे. ह्या झेपेसाठीच्या प्रोमोचे अनावरण करण्यात आले असून आता ह्या मालिकेत प्रणयाच्या मसाल्यासह बॉलिवूडचा तडका देण्यात येणार आहे.
'इश्कबाज' मालिकेतील प्रोमोमधून शिवाय नकुल मेहता आणि अनिका सुरभि चंद्रा यांचा मुलगा शिवांश बॉलिवूडमधील सुपरस्टारच्या रूपात प्रवेश करेल. ह्या रोमांचक प्रोमोमध्ये शिवाय आणि अनिका हे आपल्या शिवांश ह्या मुलाबद्दल बातचीत करताना दिसून येतील. बॉलीवूडच्या पार्श्वभूमीवरील दृश्यात ह्या सुपरस्टारला पाहून वेडी झालेली गर्दीसुद्धा दिसून येईल.
शिवांशची भूमिका कोण साकारणार हे अजूनही गुलदस्त्यात असून प्रेक्षक ते शोधून काढण्यासाठी खूप उत्सुक आहेत. बॉलिवूड सुपरस्टार शिवांश स्टार प्लसवरील 'इश्कबाज'मध्ये लवकरच येत आहे.
'इश्कबाज' मालिकेत सहा वर्षानंतर लीप येणार आहे. या मालिकेत अनिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरभीने मालिकेचा निरोप घेणार आहे. असे सांगितले जात आहे, या मालिकेत सुरभीला आईची भूमिका साकारायची होती त्यासाठी ती तयार नव्हती. या वृत्तानंतर आणखीन एक बातमी आली की सुरभीनंतर या मालिकेतील नायक शिवाय याची भूमिका साकारणारा अभिनेता नकुल मेहताने देखील ही मालिका सोडायचा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कथेनुसार सुरभीने मालिका सोडल्यानंतर नकुल मालिकेत राहणार होता. मात्र लीपनंतर शिवायच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार होता. मात्र त्याला हा ट्रॅक आवडला नाही आणि त्याने मालिकेचा निरोप घ्यायचे ठरविले. आता या मालिकेत काय वळण पाहायला मिळणार आहे, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Superstar is getting a Shivshansh coming to win your mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.