बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांनी भूमिका नाकारल्यामुळे सुनील शेट्टीला मिळाला मैं हूँ ना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 06:30 AM2019-05-07T06:30:00+5:302019-05-07T06:30:05+5:30

फराह खानने द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात तिच्या ‘मैं हूँ ना’ या चित्रपटाविषयी एक खास गोष्ट सांगितली.

Suniel Shetty was not the first choice to play villain in, ‘Main Hoon Na’ reveals Farah Khan on The Kapil Sharma Show | बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांनी भूमिका नाकारल्यामुळे सुनील शेट्टीला मिळाला मैं हूँ ना

बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांनी भूमिका नाकारल्यामुळे सुनील शेट्टीला मिळाला मैं हूँ ना

googlenewsNext
ठळक मुद्देफराहने या भूमिकेसाठी नसिरुद्दीन शाह, नाना पाटेकर आणि कमल हासन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांना विचारले होते.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी एपिसोडमध्ये फराह खान उपस्थित राहाणार आहे. फराह एक प्रसिद्ध कोरिओग्राफर असण्यासोबतच दिग्दर्शक, निर्माती आणि अभिनेत्री आहे. कपिलच्या या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील प्रवास, तिचे खाजगी आयुष्य यावर ती कपिल आणि तिच्या टीमसोबत गप्पा मारणार आहे. 


 
फराह खानने द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात तिच्या ‘मैं हूँ ना’ या चित्रपटाविषयी एक खास गोष्ट सांगितली. मैं हूँ ना या तिच्या चित्रपटात शाहरुख खान, सुश्मिता सेन, झायद खान, अमृता राव आणि सुनील शेट्टी यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात सुनीलने रंगवलेला खलनायक सगळ्यांनाच आवडला होता. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी फराहची पहिली पसंती सुनील शेट्टी नव्हता. तिनेच हे गुपित द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात उलगडले. फराहने या भूमिकेसाठी नसिरुद्दीन शाह, नाना पाटेकर आणि कमल हासन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांना विचारले होते.

याविषयी फराह सांगते, मैं हूँ ना या चित्रपटातील भूमिकेसाठी माझी पहिली पसंती नसिरुद्दीन शाह यांना होती. पण त्यांच्याकडे तारखा खूपच कमी असल्याने त्यांना शाहरुख खानच्या वडिलांची भूमिका देण्यात आली. त्यानंतर मी चेन्नईला जाऊन कमल हासन सरांना भेटले. त्यांना पटकथाही ऐकवली, पण त्यांनी नकार दिला. मग मी नाना पाटेकरशी संपर्क साधला... त्याला पटकथा आवडली तसेच त्याने कथानकात आणखी काही दृश्यांचा समावेश करण्याबद्दल सांगितले. मी त्यासाठी तयार देखील झाले. पण शेवटी नानाने सुद्धा भूमिका नाकारली. पण मी त्यानंतर विचार केला की, नायकाला खलनायकाच्या भूमिकेसाठी घेतले तर त्यात नावीन्य येईल आणि या पात्राला पुरेपूर न्याय मिळेल, हा विचार करूनच मी सुनील शेट्टीकडे गेले. चित्रपटाची केवळ अर्धी कथा ऐकूनच सुनील तयार झाला आणि शेवटी खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली. 


 
फराह या कार्यक्रमात शाहरुख खान आणि तिच्या मैत्रीविषयी देखील सांगणार आहे. ‘कभी हाँ कभी ना’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्या दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि आजही ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत.

Web Title: Suniel Shetty was not the first choice to play villain in, ‘Main Hoon Na’ reveals Farah Khan on The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.