Sumony Chakravarti shared Bikini photos; While taking a spin, the user said, 'Sharmaji has to tell!' | सुमोना चक्रवर्तीने शेअर केला बिकिनी फोटो; यूजर्सनी फिरकी घेताना म्हटले, ‘शर्माजीला सांगावे लागेल’!

कॉमेडियन कपिल शर्माच्या आॅनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली आहे. सुमोनाने काही दिवसांपूर्वीच तिच्या ट्विटर अकाउंटवर काही फोटोज् शेअर केले असून, त्यावरून सध्या ती ट्रोल होत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये सुमोना बिकिनीमध्ये असून, याच कारणामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. सुमोनाच्या या फोटोंना यूजर्सकडून विचित्र स्वरूपाच्या कॉमेण्ट्स दिल्या जात आहेत, तर काहींकडून सुमोनाचा हा अंदाज चांगलाच पसंत केला जात आहे. सुमोनाच्या काही चाहत्यांनी तर तिची या फोटोवरून फिरकीही घेतली आहे. 

सुमोनाने नुकतेच तिच्या ट्विटर अकाउंटवर तिचे काही फोटोज् शेअर केले. ज्यामध्ये ती समुद्र किनाºयावर बसलेली दिसत आहे. निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये सुमोना खूपच सुंदर दिसत आहे. सुमोनाचे हे फोटो बघून यूजर्सकडून त्यावर सातत्याने कॉमेण्ट्स दिल्या जात आहे. अनेकांना तिचा हा बोल्ड अंदाज पसंत आल्याचे दिसून येत आहे. एका यूजरने सुमोनाची फिरकी घेताना म्हटले की, ‘सरला गुलाटी हे सर्व करण्यासाठी गेली आहेस काय? शर्माजीला सांगावे लागेल’

दरम्यान, सुमोनाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना मात्र चांगलेच भावत आहेत. अनेकांनी तिच्या लूक आणि फिटनेसचे कौतुक केले आहे. काहींनी कपिल शर्माच्या अपकमिंग शोमध्ये तू दिसणार काय? असे प्रश्नही विचारले आहेत. सुमोना गेल्या काहीकाळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. अखेरीस ती ‘देव’ या टीव्ही शोमध्ये बघावयास मिळाली होती. त्याचबरोबर सुमोना ‘नाइट्स विद कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये बघावयास मिळाली होती. 
Web Title: Sumony Chakravarti shared Bikini photos; While taking a spin, the user said, 'Sharmaji has to tell!'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.