Sumona Chakravati was admitted to the hospital due to dizziness | ​सुमोना चक्रवतीला चक्कर आल्याने रुग्णालयात करण्यात आले दाखल

कलाकार महिन्यातील अनेक दिवस आणि दिवसातील कमीत कमी दहा ते बारा तास तरी चित्रीकरण करत असतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो. नुकतीच छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीची तब्येत बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमोना चक्रवर्ती कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. या कार्यक्रमातील तिची आणि कपिलची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. सध्या ती देव या मालिकेत काम करत आहे. ही मालिका देव या डिटेक्टिव्हच्या आयुष्यावर आधारित आहे. आशिष चौधरी या मालिकेत देवची भूमिका साकारत आहे. देव या मालिकेचे चित्रीकरण मढ येथे होते. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी मढला जात असताना गाडीतच सुमोनाला चक्कर आली. सुमोना सतत चित्रीकरण करत असल्याने तिच्या तब्येतीवर परिणाम झाला आहे. सुमोनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लवकरच तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. याबाबत देव या मालिकेत तिच्यासोबत काम करणाऱ्या आशिषने सांगितले, सुमोनाला कित्येक दिवसांपासून बरे नाहीये. तरीही ती चित्रीकरण करत होती. त्यामुळेच ती चक्कर येऊन पडली. आम्हाला चित्रीकरण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आम्ही रिअल लोकेशनला चित्रीकरण करत असतो. तिथे एसी नसतो. तसेच कोणत्याही लक्झरी सुविधा नसतात. त्यामुळे आमची शारीरिक मेहनत खूप होते. ती काल सेटवर येण्यापूर्वीच चक्कर येऊन पडली. तिला मी आराम करण्याचा सल्ला कित्येक दिवसापासून देत आहे. पण तिने याकडे दुर्लक्ष केले. पण आता तरी तिने आराम करण्याची गरज आहे.
सुमोनाने बडे अच्छे लगते है, द कपिल शर्मा शो यांसारख्या कार्यक्रमात देखील काम केले आहे. एवढेच नव्हे तर बर्फी या चित्रपटात देखील ती झळकली होती. सुमोनाने बाल कलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. मन या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर किक, फिर से या चित्रपटातही तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने चित्रपट, मालिकांप्रमाणे रंगभूमीवर देखील काम केले आहे. तिची अनेक नाटकं गाजली आहेत. 

Also Read : सुमोनाच्या वडिलांना रिक्षाचालकाकडून जबर मारहाण; ‘या’ क्षुल्लक कारणावरून झाला वाद!
Web Title: Sumona Chakravati was admitted to the hospital due to dizziness
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.