सिध्दार्थ दीक्षित परिवारासमोर देणार प्रेमाची कबुली !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:42 PM2019-07-01T16:42:52+5:302019-07-01T16:43:57+5:30

अनु सिद्धार्थला तिच्या घरी घेऊन जाते आणि त्याला आधार देते. अनुच्या साथीनेच सिध्दार्थला आपली माणस मिळाली आहेत.

Sukhachya Sarini Man He Bavre | सिध्दार्थ दीक्षित परिवारासमोर देणार प्रेमाची कबुली !

सिध्दार्थ दीक्षित परिवारासमोर देणार प्रेमाची कबुली !

googlenewsNext

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये खऱ्या अर्थाने सिद्धार्थच्या प्रेमाची परीक्षा सुरु झाली आहे. सिद्धार्थने घर सोडले असून त्याला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे आणि मग अनु जवळ त्याचे प्रेम व्यक्त करायचे आहे. या सगळ्या घटनांमध्ये अनु त्याच्या पाठीशी खंबीरपणे साथ देते आहे. अनु सिद्धार्थला तिच्या घरी घेऊन जाते आणि त्याला आधार देते. अनुच्या साथीनेच सिध्दार्थला आपली माणस मिळाली आहेत. आता लवकरच मालिका रंजक वळणावर येउन पोहचणार आहे जिथे सिध्दार्थ अनुच्या घरच्यांसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे.


या गोष्टीपासून अनु अनभिज्ञ आहे आणि सिद्धार्थदेखील घरच्यांना विनंती करतो कि, अनुला याबाबत काही सांगू नका कारण योग्य वेळ आली कि सिद्धार्थ अनुला याबाबत सांगणार आहे. पण, अनुच्या वडिलांनी सिद्धार्थला सांगितले आहे जो अनुच निर्णय असेल तोच आमचा असेल. आता अनुसमोर सिद्धार्थ त्याच्या भावना कसा व्यक्त करेल ? अनुच यावर उत्तर काय असेल ? दुर्गाची यावर काय प्रतिक्रिया असेल... हे बघणे रंजक असणार आहे. 


सिध्दार्थने त्याचे ठाम मत दुर्गाला सांगितले आहे, आता अनु आणि माझे लग्न कोणीच थांबवु शकणार नाही. सिद्धार्थने गहाण ठेवलेल्या बांगड्या अनु त्याला न सांगता सोडवून आणते आणि आजींना सुपूर्त करते. परंतु, सिद्धार्थच्या आईला हे सांगू नका अशी विनंती ती आजीकडे करते आई आणि मुलगा यामधील दुरावा वाढू नये म्हणून मी हे केलं अस देखील अनु आजींना सांगते. आजी दुर्गाला बांगड्या परत देते आणि सांगते जिचा तू नेहेमीच तिरस्कार करत आलीस तिने म्हणजेच अनुने या बांगड्या सोडवल्या. अनुबद्दलचे दुर्गाचे मत बदलेल का ? पुढे काय होईल हे आगामी भागात रसिकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Sukhachya Sarini Man He Bavre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.