Sudha Chandran's entry will be in the series of emperor Shani | ​सुधा चंद्रन यांची एंट्री होणार कर्मफलदाता शनी या मालिकेत

जुही परमार, सलील अंकोला, टिनू वर्मा यांसारखे प्रसिद्ध कलाकार फलदाता शनी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. आता या मालिकेत आणखी एका प्रसिद्ध कलाकाराची एंट्री होणार आहे.
कही किसी रोज, नागिन यांसारख्या मालिकांमध्ये सुधा चंद्रन यांनी एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत आणि आता त्या कर्मफलदाता शनी या मालिकेत झळकणार आहेत. या मालिकेत त्या सिंहिका ही भूमिका साकारणार आहेत. सिहिंका राहू आणि केतू यांची आई आहे. तिच्या मुलाला म्हणजेच राहूला दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीचा बदला घेण्यासाठी ती येणार आहे. या मालिकेत जोहेब सिद्दीकी राहूची भूमिका साकारत आहे. सिहिंकाच्या एंट्रीमुळे शनीच्या म्हणजेच कार्तिकेय मालवीयच्या दुःखात आणखी भर पडणार आहे. कारण सिहिंका शनी हाती घेत असलेल्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करणार आहे. सिहिंकाला ब्रम्हदेवाकडून एक वरदान मिळाले आहे. यामुळे ती लोकांच्या छायांवर नियंत्रण ठेवू शकते. शनीने एका युद्धाच्य दरम्यान राहूचे शीर धडापासून वेगळे केले होते. त्यामुळे आपल्या मुलाच्या दुरावस्थेला शनीच जबाबदार असल्याचे तिचे मत आहे आणि त्यामुळेच त्याला शक्य त्या मार्गाने त्रास देण्याचा ती प्रयत्न करते. या मालिकेविषयी सुधा चंद्रन सांगतात, माझ्या आजवरच्या सगळ्याच मालिकांमधील माझा लूक हा प्रेक्षकांना खूपच आवडलेला आहे. प्रेक्षकांना आता पुन्हा मी एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. पौराणिक मालिकेत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील माझी भूमिका देखील प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे. 

Also Read : ​'कर्मफलदाता शनी'च्या सेटची झलक

 
Web Title: Sudha Chandran's entry will be in the series of emperor Shani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.