Sucheta Khanna's entry to the series 'My Harmful Biwi'! | 'मेरी हानीकारक बिवी' मालिकेत सुचेता खन्नाची होणार एंट्री!


मेरी हानीकारक बिवी’ मालिकेत आपली अनोख्या विषयावरील मालिका छोट्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे.विशेष म्हणजे नसबंदी हा विषय अतिशय विनोदी पद्धतीने मांडणारी ही मालिका प्रेक्षकांना एका धमाल मनोरंजनाची ट्रीट ठरणार असल्याचे मालिकेच्या टीमने विश्वास व्यक्त केला आहे. वाराणसीहून आलेला अखिलेश नावाचा एक साधासुधा मुलगा आणि मुंबईमध्ये डॉक्टरकी करणारी मुलगी इरा या दोन पात्रांभोवती ही कथा फिरते. यात अखिलेश पांडे या प्रमुख भूमिकेमध्ये अभिनेता करण सुचक हा दिसणार असून अखिलेशच्या आईचे पात्र टेलिव्हिजनच्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुचेता खन्ना रंगवणार आहेत. सुचेता खन्ना या मालिकेमध्ये पुष्पा पांडे ही अगदी साचेबद्ध गृहिणी साकारणार आहेत. हे पात्र म्हणजे पतिव्रता पत्नी या गटातील स्त्रियांचं मूत्रीमंत रूप असून आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी पतीसेवेत अर्पण केले आहे. आपल्या मुलावरही त्यांचे असेच आंधळे प्रेम आहे. पुष्‍पा या घरगुती वैद्यही आहेत आणि लोकांच्या आजारपणात त्यांना घरच्याघरी बनवलेली औषधे देत असतात. दुर्दैवाने त्यांची ही मात्रा कुणावरच लागू पडत नाही.आपल्या या भूमिकेवर टिपण्णी करताना सुचेता खन्ना म्हणाल्या,मी टीव्हीच्या कामातून दीड वर्षाची ऐच्छिक रजा घेतली होती. मग एक दिवस फुल हाऊस मीडियाकडून मला फोन आला व पुष्पाच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्याबद्दल विचारणा करण्यात आली. या भूमिकेत मी त्यांना आवडले. पण सुरुवातीला ही भूमिका करावी की नाही याबद्दल माझ्या मनात साशंकता होती. हे पात्र मी प्रामाणिकपणे साकारू शकेन का, याबद्दल मला खात्री नव्हती. पण माझी निर्माती शोनाली आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक यांना माझ्याबद्दल खात्री वाटत होती आणि ही भूमिका स्वीकारण्यासाठी त्यांनी मला राजी करून घेतले. माझा स्वत:वर नव्हता इतका विश्वास त्यांना माझ्याबद्दल वाटत होता आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून मी हे काम स्वीकारले. माझा हा नवा प्रयत्न प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल व या क्षेत्रात मेरी हानीकारक बिवी’ या मालिकेतील पुष्पा पांडे म्हणून मी नव्याने सुरू केलेल्या प्रवासात ते माझी साथ देतील अशी मला आशा आहे. ’’
Web Title: Sucheta Khanna's entry to the series 'My Harmful Biwi'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.