'क्राइम पेट्रोल'ची १००० भागांसह यशस्वी वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 08:30 PM2019-03-19T20:30:00+5:302019-03-19T20:30:00+5:30

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'क्राइम पेट्रोल' कार्यक्रमाने देशाला हदरवून सोडणार्‍या गुन्ह्यांची प्रकरणे लोकांसमोर निरंतर आणली आहेत आणि धोक्याच्या सूचना ओळखून लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतात याबाबतीची जागरूकता पसरवण्याची जबाबदारी हा कार्यक्रम निभावतो आहे.

Successful development of 1000 Crimes of Crime Patrol | 'क्राइम पेट्रोल'ची १००० भागांसह यशस्वी वाटचाल

'क्राइम पेट्रोल'ची १००० भागांसह यशस्वी वाटचाल

googlenewsNext

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'क्राइम पेट्रोल' कार्यक्रमाने देशाला हदरवून सोडणार्‍या गुन्ह्यांची प्रकरणे लोकांसमोर निरंतर आणली आहेत आणि धोक्याच्या सूचना ओळखून लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतात याबाबतीची जागरूकता पसरवण्याची जबाबदारी हा कार्यक्रम निभावतो आहे. मे 2003 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता, जो गुन्हेगारी विषयावरचा सुरुवातीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाने झालेले नृशंस अपराध आणि त्यानंतर त्यासंबंधात मिळालेला न्याय याबाबत जागरूकता पसरवून सर्व वयोगटातील लोकांना यशस्वीरीत्या सक्षम केले आहे. या कार्यक्रमाने 1000 भाग यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत आणि अशाच प्रकारे प्रेक्षकांना स्वतःचे व आपल्या आसपासच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी, सजग करण्यासाठी कार्यक्रम उत्सुक आहे. 


या कार्यक्रमात पोलिस अधिकार्‍याची भूमिका करणारा अभिनेता संजीव त्यागी सांगतो, “या कार्यक्रमात काम करण्याचा माझा अनुभव खूप छान आहे. या कार्यक्रमामुळे आम्हा कलाकारांना वास्तविक जीवनात देखील खूप मान मिळतो. आम्ही जिथे कुठे जातो, तिथे लोक आमच्याशी आदराने वागतात आणि TV वर आमची जी व्यक्तिरेखा दाखवलेली असते, तसेच आम्ही असणार अशी त्यांची अपेक्षा असते. एका अभिनेत्याकडे लोक जितक्या आदराने पाहतात, त्यापेक्षा जास्त सन्मान आम्हाला मिळतो कारण आम्ही चांगल्या पोलीसाची भूमिका करतो. एका प्रकारे या कार्यक्रमाने प्रेक्षकांना आणि नागरिकांना त्यांच्या आसपास काय घडते आहे तसेच, अशी गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी ते काय करू शकतात याबाबत जागरूक केले आहे. लोक आम्हाला भेटतात, एखादा विशिष्ट भाग आवडल्याचे सांगतात व त्यातून ते काही तरी नवीन शिकले असेही सांगतात. हा एक अद्भुत अनुभव आहे आणि मला आशा आहे की आम्ही ते चांगल्या प्रकारे करत राहू.”
या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून एका पोलिस अधिकार्‍याची भूमिका करणारा राजेंद्र शिसाटकर म्हणतो, “खूप काही सांगण्यासारखे आहे आणि या कार्यक्रमात अभिनयाची १० वर्षे पूर्ण केल्यानंतर फक्त दोन ते तीन ओळींत माझा अनुभव सांगणे हे त्या अनुभवास न्याय देऊ शकणार नाही. तो अत्यंत जबरदस्त अनुभव आहे. मला स्वतःलाही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्याचे श्रेय या कार्यक्रमाचे आहे. मी नट आहे हे आता मला लोकांना सांगण्याची गरज उरत नाही. या कार्यक्रमाने मला चांगली ओळख आणि मान दिला आहे. एका दैनंदिन मालिकेने नाही तर रात्री उशिरा प्रसारित होणार्‍या गुन्हेगारी कार्यक्रमाने इतकी अचाट लोकप्रियता मिळवणे हे अद्भुतच आहे. लोकांनाही हा शो आपलासा वाटतो. क्राइम पेट्रोलमुळे पोलिस भ्रष्ट असतात अशी पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा बदलली आहे, असे मला वाटते. पोलिस येऊन माझे आभार मानतात व मला सांगतात की तुमच्या शोमुळे लोकांच्या मनात आमची चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. निर्मातेही खूप छान आहेत. त्यांनी मला अभिनय करताना माझ्या पद्धतीने व्यक्तिरेखा साकारण्याची सूट दिली आहे, त्यामुळे मी वेगळा उठून दिसतो. धन्यवाद आणि या यशाबद्दल क्राइम पेट्रोलच्या टीमचे व सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचे मनापासून अभिनंदन.”
कधी कधी काही लक्षणे, चिन्हे, घटना दुर्लक्षिल्यामुळे मोठे अपराध घडतात, ही गोष्ट क्राइम पेट्रोल हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा ठसवण्याचा प्रयत्न करतो. भयानक गुन्हे विस्तृत आणि नाट्यत्मक पद्धतीने मांडून प्रेक्षकांचे डोळे उघडण्यासाठी व समाजात घडत असलेल्या संभाव्य गुन्हेगारी प्रवृत्तींबाबत त्यांना सावध करण्यासाठी हा शो समर्पित आहे. यातील भाग प्रेक्षकांना प्रत्येक घटनेत अधिक संवेदनशीलतेने गुन्हा कसा रोखता येऊ शकला असता हे सांगतात.

Web Title: Successful development of 1000 Crimes of Crime Patrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.