Strong celebration of the letter Kothari's birthday on the set of Shakul | चाहुलच्या सेटवर ​अक्षर कोठारीच्या वाढदिवसाचे दमदार सेलिब्रेशन

अक्षर कोठारी सध्या चाहूल २ या मालिकेत प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत झळकताना दिसत आहे. या मालिकेतील त्याची सर्जाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. याच मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना तो याच भूमिकेत दिसला होता. अक्षरने या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले आहे. नुकताच अक्षरचा वाढदिवस झाला. अक्षरने त्याचा वाढदिवस त्याच्या कुटुंबीयांसोबत साजरा न करता त्या दिवशी देखील या मालिकेचे चित्रीकरण केले. 
वाढदिवस म्हटला की मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत सेलिब्रेशन असे सगळ्यांचे ठरलेले असते. पण अक्षर सध्या त्याच्या कामात प्रचंड व्यग्र आहे. तो एका डेली सोपमध्ये काम करत असल्याने त्याला त्याचा जास्तीत जास्त वेळ हा मालिकेच्या चित्रीकरणासाठीच द्यावा लागतो आणि त्यामुळे तो वाढदिवसाच्या दिवशी देखील चित्रीकरणासाठी सेटवर आला होता. दिवसभर चित्रीकरण असल्याने आपला संपूर्ण दिवस हा कामातच जाणार असेच अक्षरला वाटत होते. पण त्याच्या मालिकेच्या टीममधील सगळ्यांनी मिळून त्याला खूप छान सरप्राईज दिले. हे सरप्राईज पाहून अक्षर खूपच खूश झाला होता. 
चाहूल या मालिकेच्या टीममधील मंडळींनी एक भला मोठा केक मालिकेच्या सेटवर आणला होता. टीममधील मंडळी मिळून त्याचा वाढदिवस साजरा करणार याची त्याला काहीच कल्पना नव्हती. पण हा मोठाला केक पाहून अक्षय प्रचंड आनंदित झाला. त्याने त्याच्या टीमसोबत हा केक कापला. पण केक कापल्यानंतर टीममधील एकाही मंडळीने बर्थ डे बॉयला सोडले नाही. त्याने त्याच्या चेहऱ्यावर खूप सारा केक थापला. सगळ्या टीमने मिळून खूप मजा-मस्ती केली. 
अक्षयने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर धमाल मस्तीचे फोटो शेअर करून त्याचा वाढदिवस एवढ्या चांगल्या प्रकारे साजरा केल्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. त्याच्या या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये त्याची सहकलाकार रेश्मी शिंदे, केतकी पालव आणि या मालिकेची सगळी टीम आपल्याला दिसत आहे. 
अक्षयरने याआधी कलर्स मराठीच्याच कमला या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. 

Also Read : अक्षर कोठारीने दिली आदिवासी पाड्याला भेट
Web Title: Strong celebration of the letter Kothari's birthday on the set of Shakul
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.