The story of 'Ram Kapoor' will be seen in the program 'Cross Roads of Life' | ​‘जिंदगी के क्रॉस रोड्स’ या कार्यक्रमात राम कपूर दिसणार या अंदाजात

आपण जे जीवन जगतो ते आपण केलेल्या विविध निवडींचे परिणाम असते. सोनी टीव्ही लवकरच भारतीय टेलिव्हिजनवर काल्पनिक आणि बिन-काल्पनिक यांचा संयोग करणारा एक आगळा वेगळा कार्यक्रम जिंदगी के क्रॉसरोड्स घेऊन येत आहे. जीवनात आपण जे निर्णय घेतो आणि त्यामुळे आपल्या जीवनाला जो आकार मिळतो, त्याबाबत असलेला हा कार्यक्रम अंतर्दृष्टी आणि अभिप्राय यांची एक भावनिक सफर असल्याचा दावा आहे. या कार्यक्रमातील वास्तविकतेच्या भागाचे सूत्रसंचालन टेलिव्हिजनवरील एक ख्यातनाम आणि लाडका कलाकार राम कपूर करणार आहे.
सोनी या वाहिनीवर हा प्रतिभाशाली आणि अष्टपैलू कलाकार आता एका नव्याच रूपात दिसणार आहे. राम कपूर हा एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रशंसा मिळवलेला टेलिव्हिजनवरील कलाकार आहे. या कार्यक्रमात तो एक माणूस म्हणून प्रत्यक्ष प्रेक्षकांशी संवाद करेल. सूत्रसंचालक म्हणून तो स्टुडिओत आलेल्या आणि घरी बसून कार्यक्रम पाहणार्‍या प्रेक्षकांमधून त्यांचे अगदी मनातले विचार आणि त्यांचे दृष्टिकोन जागे करेल.
इतर लोकांच्या समस्या आणि दुविधा यांच्या मार्फत लोकांना त्यांचे स्वतःचे मूल्यमापन करण्याची संधी एका नावीन्यपूर्ण आणि परस्पर-संवादात्मक फॉरमॅटमधून देणे हे या कार्यक्रमाच्या निर्मात्याचे लक्ष्य आहे आणि जीवनासाठी मार्गदर्शकाची ही गरज पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध बॉलिवूड फॅशन डिझाइनर आणि निर्माती शबिना खान या कार्यक्रमामार्फत टेलिव्हिजनवर निर्माती बनण्यास सज्ज झाली आहे.
राम कपूरला आपण घर एक मंदिर, कसम से, बडे अच्छे लगते है यांसारख्या अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे. अनेक चित्रपटातही तो महत्त्वाच्या भूमिका साकारतो. घर एक मंदिर या मालिकेतील रामच्या कामाचे कौतुक झाले असले तरी त्या मालिकेमुळे त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. बडे अच्छे लगते है या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर बदलले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे. 

Also Read : राम कपूरची लव्हस्टोरी; वाचा दीर-भावजयीची जोडी कशी अडकली विवाहबंधनात?
Web Title: The story of 'Ram Kapoor' will be seen in the program 'Cross Roads of Life'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.