‘कृष्णा चली लंडन’चे कथानक पाच वर्षांनी जाणार पुढे, असा असणार ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 12:51 PM2019-04-23T12:51:56+5:302019-04-23T12:52:02+5:30

'कृष्णा चली लंडन’ या मालिकेच्या कथानकाचा काळ पाच वर्षांनी पुढे नेण्यात येणार असून त्यामुळे कथानकात आणि कृष्णा,  डॉ. वीर यांच्या जीवनात तसेच शुक्ला कुटुंबात काही बदल रसिकांना पाहायला मिळतील.

The story of 'Krishna Walks London' will be going on after five years, that would be Twist | ‘कृष्णा चली लंडन’चे कथानक पाच वर्षांनी जाणार पुढे, असा असणार ट्विस्ट

‘कृष्णा चली लंडन’चे कथानक पाच वर्षांनी जाणार पुढे, असा असणार ट्विस्ट

googlenewsNext

छोट्या पडद्यावर 'कृष्णा चली लंडन’ ही मालिका चांगलीच गाजते आहे. या मालिकेला रसिकांनी चांगलेच डोक्यावर घेतलं आहे. रसिकांची आवडती मालिका म्हणून 'कृष्णा चली लंडन’ या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेतील शुक्ला कुटुंबांमधील  नातेसंबंध तसेच मालिकेची नायिका कृष्णा (मेघा चक्रबोर्ती) रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले. आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. लवकरच या मालिकेच्या कथानकाचा काळ पाच वर्षांनी पुढे नेण्यात येणार असून त्यामुळे कथानकात आणि कृष्णा,  डॉ. वीर यांच्या जीवनात तसेच शुक्ला कुटुंबात काही बदल रसिकांना पाहायला मिळतील.

या नव्या बदलाबद्दल मेघा म्हणाली, “कृष्णाच्या नव्या रूपाबद्दल मी खूपच आशावादी आणि उत्साही असून त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर येणार आहे. लंडनमध्ये डॉक्टर बनण्याचे आपले स्वप्न तिने साकार केले आहे.तसेच आता तिने स्वतःत बराच बदल केला आहे. एक सक्षम महिलेल्या रूपात ती रसिकांना पाहायला मिळणार आहे. 

 

सध्या ती डॉ. कृष्णा म्हणून आपले जीवन जगत आहे. तिच्यात  अधिक आत्मविश्वास आणि धाडसी बनल्याचे प्रेक्षकांना दिसेल आणि त्यातच तिचा पती राधे हा जिवंत असल्याची बातमी तिला मिळेल. प्रेक्षकांना या नव्या कृष्णाचा आणि माझा अभिनय आवडेल आणि ते पूर्वीप्रमाणेच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतील अशी आशा तिने व्यक्त केली आहे.”

Web Title: The story of 'Krishna Walks London' will be going on after five years, that would be Twist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.