STAR Screen Awards 2017: Varun Dhawan with Tharakali Madhuri on 'Tamma Tamma' song | STAR Screen Awards 2017:'तम्मा तम्मा' गाण्यावर वरूण धवनसह थिरकली माधुरी दिक्षित

अवॉर्डस कलाकारांसाठी महत्वाचे असतात. त्यापासून त्यांना नवं काम करण्याची प्रेरणा मिळते.म्हणूनच पुरस्कार सोहळ्‌यांचा सीझन परतला असून या पुरस्कार सोहळ्यांने सुरूवात झाली आहे 'स्टार स्क्रीन ॲवॉर्ड्‌स'ने या सोहळ्यात सेलिब्रेटींच्या एक से बढकर एक परफॉर्मन्सने या सोहळ्याला चारचाँद लावले होत.या सोहळ्यातला खास क्षण अक्षरक्षःरसिकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा असाच होता. तो क्षण म्हणजे जेव्हा बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितने सुपरहिट गाणं  तम्मा तम्मा गाण्यावर ठेका धरताच उपस्थितांनाही थिरकायला भाग पाडल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी माधुरीला साथ दिली  वरूण धवनने. धकधक गर्लचा परफॉर्मन्स 'चोली के पीछे क्या है', 'हम्मा हम्मा' आणि अखेर 'तम्मा तम्मा'अशा गाण्यांवर माधुरीने परफॉर्म केले.माधुरीला ह्या गाण्यावर थिरकताना पाहून तो स्वतःला रोखू शकला नाही आणि मग वरूनला माधुरीनेच मंचावर बोलावले.ह्या दोघांना जबरदस्त परफॉर्मन्सने या सोहळ्याचे रंगत अधिकच वाढली होती.स्टार स्क्रीन ॲवॉर्ड्‌स २०१७ चे सूत्रसंचालन जुडवा जोडी सलमान खान आणि वरूण धवन यांनी केले. ही सगळी धम्माल लवकरच रसिकांना छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. स्टार स्क्रीन ॲवॉर्ड्‌स३१ डिसेंबरला पाहायला मिळणार आहे.या सोहळ्याला अमिताभ बच्चन, सलमान खान, वरूण धवन, माधुरी दिक्षित,क्रिती सेनॉन, एलियाना डिक्रूझ, टायगर श्रॉफ, तापसी पन्नू, भूमी पेडणेकर, विद्या बालन आणि इरफान खान यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी हटक्या स्टाइलमध्ये उपस्थिती लावली होती.

Also Read:स्टार स्क्रीन अॅवॉर्ड्‌स २०१८ मध्ये या कलाकारांनी मारली बाजी.जाणून घ्या कोण ठरले सर्वोत्तम अभिनेता आणि अभिनेत्री


विशेष म्हणजे या सोहळ्यावेळी दबंग खान ठरलेल्या वेळेनुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहाचला आणि लगेच मंचावर जाऊन त्याने आपल्या सूत्रसंचालनाच्या ओळींचा सराव करायला सुरूवात केली. सलमानला बरे नसतानाही त्याने उत्तम परफॉर्म केले.स्टार स्क्रीन ॲवॉर्ड्‌सच्या मुख्य कार्यक्रमाआधीच सलमानचा घसा खराब झाला होता पण तरीही त्याने ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.यावरून ऑनस्क्रीन 'वॉन्टेड' सिनेमामधील ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो मैं अपने आप की भी नहीं सुनता’सुपरहिट डायलॉग रिल लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्येही सलमान खान पाळत असल्याचे पाहायाला मिळत आहे.
Web Title: STAR Screen Awards 2017: Varun Dhawan with Tharakali Madhuri on 'Tamma Tamma' song
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.