“सूर नवा ध्यास नवा”च्या मंचावर स्पर्धकांना मिळाले आशुतोष गोवारीकर यांच्याकडून एक खास सरप्राईझ !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 06:12 AM2018-03-08T06:12:18+5:302018-03-08T15:22:23+5:30

सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला स्पर्धकांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अतिथी येतात. या आठवड्यामध्ये ...

On the stage of "Sur Nava Dhaswa Nava", the participants got a special surprise from Ashutosh Gowarikar! | “सूर नवा ध्यास नवा”च्या मंचावर स्पर्धकांना मिळाले आशुतोष गोवारीकर यांच्याकडून एक खास सरप्राईझ !

“सूर नवा ध्यास नवा”च्या मंचावर स्पर्धकांना मिळाले आशुतोष गोवारीकर यांच्याकडून एक खास सरप्राईझ !

googlenewsNext
र नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला स्पर्धकांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अतिथी येतात. या आठवड्यामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात दिग्दर्शक,निर्माते आशुतोष गोवारीकर आले होते. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून आशुतोष गोवारीकर आणि कॅप्टनसचे मन जिंकले. कार्यक्रमादरम्यान स्पर्धकांची एका पेक्षा एक सरस गाणी सादर होत असताना आशुतोष यांनी स्पर्धकांना बरेच मोलाचे सल्ले दिले आणि त्यांना प्रोत्साहन देखील दिले. सूर नवा ध्यासचा हा विशष भाग सुरु असतानाच स्पर्धकांना आशुतोष गोवारीकर यांनी एक सरप्राईझ दिले ज्यामुळे हा भाग अजूनच विशेष बनला. इतक्या मोठ्या माणसाकडून हे सरप्राईझ मिळणे म्हणजे स्पर्धकांना मिळालेली शाबासकीच असं म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

या विशेष भागाची सुरुवात झाली आशुतोष गोवारीकर यांच्याच चित्रपटातील या रे या सारे या या गाण्याने. त्यानंतर श्रीनिधी, मधुरा कुंभार, शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, यांनी एका पेक्षा एक सरस गाणी म्हंटली.आशुतोष यांची काही आवडती गाणी देखील स्पर्धकांनी सादर केली. याच दरम्यान आशुतोष गोवारीकर यांनी लगान तसेच स्वदेस चित्रपटा दरम्यानच्या काही आठवणी देखील सांगितल्या. स्पर्धकांची गाणी ऐकून आशुतोषजींनी जाहीर केले जो कोणी सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा विजेता किंवा विजेती असेल त्याला त्यांच्या चित्रपटासाठी गाणं गाण्याची सुवर्णसंधी मिळेल. हे कळल्यानंतर सगळ्याच स्पर्धकांना खूप आनंद झाला.


हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. लोकसंगीत असो,शास्त्रीय संगीत असो वा वेस्टर्न संगीत असो या गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे.या स्पर्धकांमधीलच एक जिने आपल्या सुमधुर गायकीने, सुरांनी प्रेक्षकांना आपलेसे केले आहे अशी सगळ्यांचीच लाडकी शरयू दाते ही गाण्याबरोबरच उत्तम चित्र देखील काढते.“सूर नवा ध्यास नवा” या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रक्षेपित झालेल्या भागामध्ये शरयूने भारतरत्न लता दीदी यांचे काढलेले एक सुंदर स्केच प्रेक्षकांना दाखवले. इतकेच नव्हे तर याव्यतिरिक्त देखील तिने तिच्या गुरु आरती अंकलीकर यांचे स्केच देखील काढले होते.

Web Title: On the stage of "Sur Nava Dhaswa Nava", the participants got a special surprise from Ashutosh Gowarikar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.