Special gifts, received by Thakkarwadi postmasters, know about this gift | थुकरटवाडीतील पोस्टमनकाकांना मिळालं हे स्पेशल गिफ्ट, जाणून घ्या या गिफ्टबाबत

''डाकियाँ डाक लाया'', ''चिठ्ठी आयी है चिठ्ठी आयी है''… पत्रं आणि ती पत्रं घरोघरी पोहचवणाऱ्या पोस्टमन काकांचं महत्त्व सांगणारी अशी अनेक गाणी प्रसिद्ध झाली होती. सिनेमा बनवणाऱ्यांनाही दखल घ्यायला लावेल अशी खासियत पत्रांमध्ये होती. मात्र काळ बदलला, कॉम्प्युटर आले, मग इंटरनेटच्या माध्यमातून पत्ररुपी संवाद सुरु झाला. हळूहळू पत्रांचं महत्त्वं कमी होऊ लागलं. गेल्या काही वर्षात तर मोबाईल, स्मार्टफोन यामुळे व्हॉट्सअॅप, व्हिडीओ कॉलिंग आणि एसएमएसने पत्रांची जागा घेतली. क्षणात आपल्याला आपल्याला हव्या त्या व्यक्तीशी कुठूनही संवाद साधणं सहज शक्य झालं. त्यामुळे काळाच्या ओघात पत्रं आणि पोस्टमन काका हरवले. व्हॉटसअॅप आणि इमेलच्या जमान्यात पत्र खूप मागे पडलं असलं तरीही पत्रव्यवहाराची जादू काही औरच असते आणि पोस्टमनच्या येण्याचं आजही तितकंच अप्रूप वाटतं. एक पोस्टमन तर छोट्या पडद्यावरुन घराघरांत पोहोचलाय आणि तो साऱ्यांनाचा लाडका बनला आहे. 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोच्या माध्यमातून हरवलेली पत्रं आणि पोस्टमन काका पुन्हा समोर आले. विनोदवीर आणि अभिनेता सागर कारंडे पोस्टमन काका बनून या शोमध्ये अवतरतो. या शोमधील पोस्टमन काकांची पत्रं नेहमीच बरंच काही सांगून जातात.कधी कधी चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात अश्रू आणत ही पत्रं विविध सामाजिक संदेश देतात.अरविंद जगताप यांचं लेखन आणि सागर कारंडेचं पोस्टमन काका बनून पत्र वाचन या शोचा यूएसपी ठरला आहे. नुकतंच अभिनेता सागर कारंडेला एक खास गिफ्ट मिळालं. त्याने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंटस केल्या आणि लाईकही केले. त्या फोटोतील पोस्टमन काकांचा हा बाहुला त्याला नक्की दिला कुणी दिला असावा असा प्रश्न अनेकांना पडला. तर एका फॅननंच सागरला हा बाहुला भेट म्हणून दिला.आपल्या आवडत्या भूमिकेमुळे हा बाहुला सागरलाही खूप भावला आहे.

Also Read:सोशल मीडियावर भाऊ कदम,कुशल आणि श्रेयाचा पाऊट घालतोय धुमाकूळ, कसा वाटला तुम्हाला त्यांचा हा अंदाज?
Web Title: Special gifts, received by Thakkarwadi postmasters, know about this gift
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.