नेहा आईकडून परीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:30 AM2018-12-24T06:30:00+5:302018-12-24T06:30:00+5:30

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा आईने असेच एक खास सरप्राईज तिच्या लाडक्या परीला दिले आहे.

A special Christmas gift received from Neha mother in Nakalat Sare Ghadle serial | नेहा आईकडून परीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट

नेहा आईकडून परीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट

googlenewsNext
ठळक मुद्देनेहा आई बनली सॅण्टासॅण्टाने परीला दिले ख्रिसमस गिफ्ट


ख्रिसमस जवळ आला की आपोआपच सेलिब्रेशनचे बेत आखले जातात. ख्रिसमस ट्री सजवण्यापासून ते अगदी सरप्राईज गिफ्ट पर्यंत सगळ्याच गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण एन्जॉय करत असतात. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा आईने असेच एक खास सरप्राईज तिच्या लाडक्या परीला दिले आहे. 

ख्रिसमसच्या रात्री सॅण्टा येऊन आपल्याला आवडीचे गिफ्ट देतो ही गोष्ट परीला माहित होती. यावेळी मात्र तिने नेहा आईकडे सॅण्टाकडूनच गिफ्ट हवे अशी इच्छा व्यक्त केली. परीचा हट्ट पुरवण्यासाठी मग नेहा आईच सॅण्टा बनली आणि तिने परीला एक खास गिफ्ट दिले. नेहा आईकडून मिळालेल्या या खास गिफ्टमुळे परीचा आनंद गगनात मावत नव्हता.
परी आणि नेहा आईमधील मॅजिक बॉण्ड सर्वांनाच माहितीय. ख्रिसमसच्या या मोक्यावर हा बॉण्ड आणखी घट्ट झाला आहे. ‘ख्रिसमस हा माझा सर्वात आवडता सण आहे. मला सरप्राईज गिफ्ट्स द्यायला खूप आवडतात. त्यामुळे यंदाचे गिफ्ट मी परीला दिले आहे. परीच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप सुखावणारा आहे.’ अशी भावना नेहाची भूमिका साकारणाऱ्या नुपूर परुळेकरने व्यक्त केली.
माय-लेकीमधला हा मॅजिक बॉण्ड अनुभवण्यासाठी न चुकता ‘नकळत सारे घडले’ सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पहा.
 

Web Title: A special Christmas gift received from Neha mother in Nakalat Sare Ghadle serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.