Soumya tondan baby pics got viral | सौम्या टंडनचा बाळासोबतचा 'हा' क्युट फोटो तुम्ही पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल
सौम्या टंडनचा बाळासोबतचा 'हा' क्युट फोटो तुम्ही पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

ठळक मुद्देसौम्याने बाळाचे नाव 'मिरान' ठेवले आहेयाआधी सौम्याने मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता

भाभीजी घर पर है’ या मालिकेने घराघरात पोहोचलेली अनिता भाभी अर्थात सौम्या टंडनने काही दिवसांपूर्वी एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सौम्याने बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सौम्या आपल्या झोपलेल्या बाळाकडे प्रेमाने बघून हसते आहे. सौम्याने बाळाचे नाव 'मिरान' ठेवले आहे.

सौम्याने आपल्या फॅन्सकडून बाळाच्या नाव सुचवण्यासाठी सांगितले होते. तिच्या सिंगापुरमध्ये राहणाऱ्या एका फॅनने तिला हे नाव सुचवले. याआधी सौम्याने मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 

डिसेंबर २०१६ मध्ये सौम्याने बॉयफ्रेंड आणि बँक अधिकारी सौरभ देवेन्द्र सिंहसोबत लग्न केले होते. सौम्या आणि सौरभ जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट करत होते. सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.  
 


Web Title: Soumya tondan baby pics got viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.