Sony Sabe Jeejaji is on the roof, in the series, Haiba Nawab and Nikhil Khurana in the series | ​सोनी सबच्या जिजाजी छत पर है मालिकेत हिबा नबाव आणि निखिल खुराना

हसते रहो इंडिया ही आपली टॅगलाईन कायम सत्यात उतरावी यासाठी सोनी सब एका नव्या आणि वेगळ्या बाजाची संकल्पना घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. पार्टनर्स – ट्रबल हो गयी डबल ही मालिका आणल्यानंतर आता सब अजून एक नवी मालिका जिजाजी छत पर है प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या मालिकेत हिबा नवाब आणि निखिल खुराणा ही जोडी प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 
जिजाजी छत पर है ही इलायची आणि पंचमच्या आयुष्याभोवती फिरणारी कथा आहे. हिबा नवाब या भूमिकेत इलायचीची भूमिका साकारणार आहे. तिच्या नावाप्रमाणेच ती वेगळी आहे. ती काहीशी मस्तीखोर आहे. ती नेहमीच आपल्या मर्जीनुसारच जगते. तर निखिल खुराणा संगीत दिग्दर्शक बनण्याचे एकमेव स्वप्न असणारा लहान शहारातून आलेल्या पंचमची भूमिका साकारणार आहे. संगीत क्षेत्रात जम बसवताना तो इलायचीच्या वडिलांना भेटतो. तो त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात करतो आणि त्यांच्या एक लहान खोलीमध्ये भाड्याने राहायला येतो. पण इथे आल्यानंतर इलायचीच्या रोजच्या खोड्यांना बळी पडतो. आपल्या भूमिकेविषयी हिबा नवाबने सांगितले, “ही माझी दुसरी विनोदी मालिका आहे. यामध्ये काम करण्यासाठी मी खूपच उत्साही आहे. कारण मला वाटतं, कोणत्याही गोष्टीवर हसणे हे उत्कृष्ट औषध आहे. मी खऱ्या आयुष्यात अशी अजिबातच नाहीये. तसेच मी पूर्वी अशी कधीच भूमिका साकारलेली नाही. त्यामुळे या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे.”
पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा सांगतो, “मी आजवर अशाप्रकारची भूमिका कधीच साकारली नसल्याने ही व्यक्तिरेखा करण्याचा अनुभव अतिशय वेगळा आणि खूपच चांगला आहे. या टीमसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच छान आहे. आमच्या सेटवर नेहमीच खेळीमेळीचे वातावरण असते. त्यामुळे या मालिकेत काम करायला खूपच मजा येत आहे. आमची ही मालिका प्रेक्षकांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 
Web Title: Sony Sabe Jeejaji is on the roof, in the series, Haiba Nawab and Nikhil Khurana in the series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.