The song that started in the series started with Shital and Ajinkya's wedding preparations | ​लागीरं झालं जी या मालिकेत सुरू झाली शितल आणि अजिंक्यच्या लग्नाची तयारी

'लाखात एक माझा फौजी' असे म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील 'लागीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा गाठला. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे ही मालिका हे यश आणि टीआरपीचे उच्चांक गाठू शकली. शीतली आणि अज्याची प्रेमकथा प्रेक्षकांना भावात आहे, तशीच ती आपलीशी देखील वाटत आहे. शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमाला अनेकांचा विरोध होता... पण तो विरोध न जुमानता त्यांच्या प्रेमावरील दृढ विश्वासामुळे ते दोघे लवकरच एकत्र येणार आहेत. लग्नाची बोलणी झाल्यानंतर अजिंक्य आणि शीतलच्या लग्नाचा मुहूर्त ३० मे चा निघाला आहे.
दोन्ही घरात लगीनघाई आणि लगबग दिसून येतेय. लग्नाच्या खरेदीपासून ते अगदी मेहंदी, हळद अशा सर्व कार्यक्रमाची तयारी करण्यात दोन्ही कुटुंबीय व्यग्र आहेत. शीतलच्या हातावर अजिंक्यच्या नावाची मेहंदी लागली आहे, तसेच संगीतमध्ये सर्व जण आनंदाने थिरकणार आहेत. सौभाग्याचं लक्षण म्हणजेच हिरवा चुडा शीतलच्या हातात भरण्यात आला आहे. लग्न जरी सामूहिक लग्न समारंभात होणार असलं तरी बाकीचे कार्यक्रम अगदी आनंदाने दोन्ही कुटुंबीय पार पडणार आहेत. 
अजिंक्य आणि शीतलचे लग्न ३० मे ला होणार आहे. खरे तर लग्न सामूहिक लग्न समारंभात न करता धुमधडाक्यात करायचे ठरले होते. दोघांच्याही घरी लग्नाची गडबड सुरू होती. पण जयश्री अचानकपणे लग्न करून आल्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या अशा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे घरात वादविवाद झाले. पण अजिंक्य शीतलचं लग्न ठरल्यावेळी करायचं ठरलं. मात्र त्यांचं लग्न होऊ नये यासाठी हर्षवर्धन खूप अतोनात प्रयत्न करत होता. त्याने त्यांच्या लग्नात अडथळा आणण्यासाठी शीतलच्या घरात आर्थिक संकटं आणलं. ज्यामुळे शेवटी अजिंक्य आणि शीतलने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करायचा निर्णय घेतला आणि घरच्यांची त्यासाठी परवानगी देखील मिळवली.
लागीरं झालं जी या मालिकेत शिवानी बावकर शितलची तर नितीश चव्हाण अंजिक्यची भूमिका साकारत आहे. 

Also Read : लागीरं झालं जी या मालिकेत शीतलची भूमिका साकारणाऱ्या शिवानी बावकरला या मालिकेसाठी मिळते इतके मानधन
Web Title: The song that started in the series started with Shital and Ajinkya's wedding preparations
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.