बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरला चिमुकल्या सोनाक्षी सिन्हाने दिलेला पुरस्कार,२ दशकांपूर्वीच्या व्हिडीओत ओळखा पाहू सोनाक्षीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:28 PM2018-07-13T14:28:41+5:302018-07-14T08:00:00+5:30

हा फोटो जवळपास २० वर्षांपूर्वीचा एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. २ दशकांपूर्वी 'कुछ कुछ होता है' या सिनेमासाठी करण जोहरला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला होता.

Sonakshi Sinha, Bollywood's Daddy director Karan Johar, gave the award to Sonakshi Sinha, two decades ago. | बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरला चिमुकल्या सोनाक्षी सिन्हाने दिलेला पुरस्कार,२ दशकांपूर्वीच्या व्हिडीओत ओळखा पाहू सोनाक्षीला

बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरला चिमुकल्या सोनाक्षी सिन्हाने दिलेला पुरस्कार,२ दशकांपूर्वीच्या व्हिडीओत ओळखा पाहू सोनाक्षीला

googlenewsNext

बॉलीवुडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर एक जुना फोटा शेअर केला आहे. या फोटोमध्ये बॉलीवुडच्या दिग्गज व्यक्ती पाहायला मिळत आहेत. यांत करणसह बॉलीवुडचे इतर ३ जण दिसत आहेत. यापैकी दोघांना तर तुम्ही सहज ओळखाल, मात्र तिसरी व्यक्ती कोण असा प्रश्न तुम्हाला पडेल. हा फोटो जवळपास २० वर्षांपूर्वीचा एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. २ दशकांपूर्वी 'कुछ कुछ होता है' या सिनेमासाठी करण जोहरला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार एका मुलीच्या हातून करणला प्रदान करण्यात आला होता. डोळ्यावर चष्मा अशा लहानग्या  मुलीने करणला हा पुरस्कार दिला. ही चिमुरडी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून आजची आघाडीची नायिका सोनाक्षी सिन्हा आहे. चिमुकल्या सोनाक्षी आणि करणसह यावेळी अभिनेता शत्रुघ्न सिन्हा तसंच दिग्दर्शक सुभाष घई पाहायला मिळत आहेत. 

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत ‘दबंग’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली. त्यानंतर सोनाक्षीचा बॉलिवूडमधील प्रवास असा काही राहिला की, तिने अल्पावधीतच यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळविले. आतापर्यंत सोनाक्षीने अनेक हिट चित्रपट दिले. त्याचबरोबर इंडस्ट्रीतील सीनिअर अभिनेत्यांसोबत काम करण्याचे भाग्यही तिला लाभले. सध्या ती आगामी ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या चित्रपटात पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ यांच्यासोबत काम करीत आहे. मात्र हा चित्रपटदेखील तिला भाईजान सलमानमुळेच मिळाल्याची चर्चा आहे. या चित्रपटात सलमानने एका गाण्यात कामही केले आहे. याविषयी सोनाक्षीने म्हटले की, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’मधील एका गाण्यास सलमानसोबत काम करण्याचा अनुभव खूपच इंटरेस्टींग होता.‘नैन फिसल गए’ या गाण्यात सोनाक्षी सिन्हा ड्रीम सीक्वेन्समध्ये सलमान खानसोबत बघावयास मिळत आहे. या गाण्याची शूटिंग न्यूयॉर्क येथे झाली. सोनाक्षीने सांगितले की, ‘दबंग आणि दंबग-२’ नंतर सलमानसोबत या गाण्यात काम करण्याचा अनुभव खूपच अविस्मरणीय असा राहिला आहे. संपूर्ण गाण्याची शूटिंग न्यूयॉर्क येथे झाली आहे. 
 

Web Title: Sonakshi Sinha, Bollywood's Daddy director Karan Johar, gave the award to Sonakshi Sinha, two decades ago.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.