So Soumya Tandon fears the role of 'Bhabhiji is at home'? | म्हणून सौम्या टंडनला 'भाभीजी घर पर है'मधील भूमिकेची वाटायची भीती ?

'भाभी जी घर पर है' या लोकप्रिय विनोदी मालिकेमध्ये गोरी मेम किंवा अनिता भाभीचे पात्र साकारणार्या सौम्या टंडन या गुणवान अभिनेत्रीने आपल्या सफाईदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे. मात्र, आज घराघरात पोहोचलेले हे पात्र साकारण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा सौम्या यांच्याकडे आला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती हे कुणाला फारसे माहीत नसेल.ही मालिका स्वीकारण्याबद्दल आपण साशंक होतो आणि होकार कळवण्यासाठी आपण जवळजवळ सात महिने घेतले असे सौम्या यांनी नुकतेच जाहीर केले आहे.सौम्या म्हणाल्या, ''मनापासून करावंसं वाटावं असं कोणतंच काम माझ्यासमोर येत नव्हतं. एखादा थोडा काळ चालणारा, कथाबाह्य कार्यक्रम स्वीकारावा असं मला वाटत होतं. कारण डेली सोपमधलं काम म्हणजे जवळजवळ लग्नाची बेडीच असते. तो एक खूप मोठा निर्णय असतो त्यामुळे डेली सोपमध्ये काम म्हटलं की मला घाम फुटायचा. पौराणिक मालिका, सासू-सुनांच्या त्याच त्या कहाण्या किंवा स्लॅपस्टिक कॉमेडी मला जमली नसती. पण 'भाभी जी घर पर है' ही मालिका मात्र मला अगदी हवी तशीच वाटली.'''भाभी जी घर पर है' मध्ये दोन शेजारी एकमेकांच्या बायकांभोवती रुंजी घालताना दिसतात. अशा विषयावरील मालिका फार चटकन अश्लीलतेकडे, गावरानपणाकडे झुकण्याची शक्यता असते. असे असताना या मालिकेत भूमिका स्वीकारण्याबद्दल मनात शंका होती का? असे विचारले असता सौम्या म्हणाल्या, ''मी खरोखरच घाबरले होते, पण सगळे काही नीट झाले. अर्थात मी एकटी त्याचे श्रेय घेणार नाही. या टीमला खरोखरीच उत्तम कलाकारांची टीम लाभली आहे. ''

सौम्या बाजारात मिळणाºया भाजीपाल्याच्या दर्जावरूनही चांगलीच त्रस्त असल्याचे समजते. त्यामुळेच तिने स्वत: शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. सौम्याने म्हटले की, काही दिवसांपूर्वीच मी नाशिक आणि सूरतमध्ये गेली होती. ज्याठिकाणी मला खूप चांगला ताजा भाजीपाला मिळाला. मात्र मुंबईमध्ये मिळणा-या भाजीपाल्याचा दर्जा आता पूर्वीसारखा राहिला नाही. मला आठवतेय की, लहानपणी खूपच चांगला भाजीपाला आणि फळे मिळत असत. मात्र आता आपल्याकडे चांगले बी-बियाणे नसल्याने लोक हायब्रिड बी-बियाणांचा आधार घेत आहेत. परिणामी चांगला भाजीपाला बाजारात मिळणे आता मुश्किल झाले आहे. या भाजीपाल्याचा आरोग्यावरही परिणाम होत असून, रोगराईचे प्रमाण वाढल्याचेही तिने सांगितले. 

Web Title: So Soumya Tandon fears the role of 'Bhabhiji is at home'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.