So, 'Saraswati' means that this time Gudipadva special for Tiktiksha Tawde! | म्हणून 'सरस्वती'म्हणजेच तितिक्षा तावडेसाठी यावेळेसचा गुढीपाडवा खास!
म्हणून 'सरस्वती'म्हणजेच तितिक्षा तावडेसाठी यावेळेसचा गुढीपाडवा खास!
'सरस्वती' ही मालिका सुरु झाल्यापासूनच प्रेक्षकांनी तिला आपलेसे केले.मालिकेमधील मोठ्या मालकांची सरस्वती म्हणजेच तितिक्षा तावडे प्रेक्षकांची मनं कमी कालावधीतच जिंकली आहेत.सरस्वती मालिकेमध्ये तितिक्षाने आपल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या कधी प्रेमळ,कधी करारी,खंबीर तर कधी डबल रोल करताना दुर्गा बनून तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.आता ती मालिकेमध्ये दुर्गांच बनून नकारात्मक भूमिका साकारत आहे.तितिक्षा सोशल मीडियाद्वारे तिच्या आयुष्यातील काही क्षण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते.आता नुकतेच खुशबू म्हणजेच तिच्या बहिणीचे लग्न संग्राम साळवी बरोबर झाले आणि तीतीक्षाने तिच्या बहिणी बरोबरचे छानसे फोटो देखील शेअर केले आहेत.या वेळेसच्या गुढीपाडवा बद्दल विचारले तेंव्हा ती म्हणाली,“सरस्वती मालिकेमध्ये मला गेल्या वर्षी बरेच काही वेगळे करण्याची संधी मिळाली.पण येत्या वर्षी अजून मेहनत करून अजून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा नक्कीच आहे.दरवर्षीच गुढीपाडवा खास असतो कारण नव्या वर्षाची सुरुवात असते पण यावेळेसचा गुढीपाडवा खूप खास आहे कारण माझ्या बहिणीच्या आयुष्याची नव्याने सुरुवात झाली आहे.आणि लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे.त्यामुळे त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी स्पेशल आम्ही करू आणि मला खात्री आहे आणि त्यांनाही ते आवडेल”.

खूशबु तावडे आणि संग्राम साळवी 5 मार्चला हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत.मोठ्या थाटात पारंपारीक विवाह पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला.यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.या लग्नसोहळ्याला दोघांचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.या नवदाम्पत्याच्या विविध अदा,लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.खुशबूप्रमाणेच संग्रामदेखील मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. 'देवयानी' या मालिकमुळे संग्राम साळवी घराघघरात पोहचला.खुशबू तावडे हे नाव केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीतदेखील तितकेच प्रसिद्ध आहे. 'तू भेटशी नव्याने', 'पारिजात' यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले असून 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'सिंहासन बत्तीसी' यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे. तिने 'तेरे बीन' या मालिकेत काम केले होते. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. 
Web Title: So, 'Saraswati' means that this time Gudipadva special for Tiktiksha Tawde!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.