So Rana tells Pathakbai that you lived in the forest | म्हणून राणा पाठकबाईंना म्हणतो तुझ्यात जीवं रंगला

राणा आणि अंजलीबाई यांच्यामुळे कोल्हापूरच्या रांगडी मातीतील प्रेमकथा प्रेक्षकांना 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाहायला मिळत आहे.चालतंय की म्हणत मनं जिंकणा-या राणा दा सोबत मालिकेतील शांत, संयमी आणि सोज्वळ अशा पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरसुद्धा लोकप्रिय ठरली आहे. अक्षया देवधर मालिकेत साधी, शांत, संयमी दिसणा-या या पाठकबाईंचा प्रत्येक अंदाज रसिकांनाही चांगलाच भावतो आहे. पाठकबाईंच्या या फोटोमध्येही त्यांच्या चेह-यावरील निरागस भाव पाहायला मिळत आहेत.राणा आणि अंजली या दोघांचाही विभिन्न स्वभावाचीही प्रेम कथा असून या मालिकेद्वारे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोन नवे चेहरे रसिकांच्या मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहेत.राणा आणि अंजली यांची ही कथा असून राणा हा एक पहिलवान आहे.अतिशय श्रीमंत घराण्यातला असूनही त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व नाहीये.असा हा राणा दा सगळ्यांच्या पसंतीस पडत असला तरी पाठकबाई म्हणजचे अंजली देखील रसिकांच्या मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेत राणा अंजली बाईंच्या प्रत्येक अदांवर फिदा होत असल्याचे पाहायला मिळतो.त्यामुळेच आता रसिकही राणा दा बरोबर अंजलीबाईंना म्हणतात 'तुझ्यात जीव रंगला'.

Web Title: So Rana tells Pathakbai that you lived in the forest
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.