So Radhika is the ideal mother of small screen | म्हणून राधिका आहे छोट्या पडद्यावरची आदर्श आई

टीआरपीचे उच्चांक गाठलेली झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिका या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली होती.तसेच या मालिकेतील प्रत्येक पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहे.राधिका या व्यक्तिरेखेच्या प्रेक्षकांनी आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श बहीण आणि आदर्श आई या सर्व छटा पाहिल्या. मुलाच्या उत्तम भविष्यासाठी तिला अर्ध्या वाटेत सोडून गेलेल्या गुरुनाथच्या नाकावर टिचून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची जिद्द राधिकाने दाखवली.स्वतःच्या पायावर उभी राहून कुटुंबाचं पालनपोषण करणाऱ्या या छोट्या पडद्यावरच्या आईने अनेक स्त्रिया आणि आईसमोर एक आदर्श ठेवला आहे. स्वाभिमान आणि स्वावलंबनाचा धडा राधिकाने सर्वांना शिकवला. अनेक स्वप्न मनाशी बाळगणाऱ्या आईंची ती प्रेरणा बनली. मातृ दिनानिमित्त राधिकाचं पात्र साकारणाऱ्या अनिता दातेने  यावेळी तिच्या  आईबद्दल आईबद्दल भावन व्यक्त केल्या."आईपण म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी मी नेहमीच माझ्या आईकडे बघत आले. माझी आई अत्यंत केअरिंग आहे. मातृत्वाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे काळजी करणं, आपला विचार करण्याआधी आपल्या मुलांचा विचार करणे. ही वृत्ती मी सातत्यानं माझ्या आईमध्ये पाहिली. माझ्या आईसाठी आम्ही मुली म्हणजेच तिचं विश्व होतो.प्रत्येक आई आपल्या मुलाला तितकंच प्रेम करते वेळप्रसंगी आपल्या मुलाने काही चूक केली तर त्याला आई ओरडते त्याच्यावर चिडते पण ते सर्व क्षणिक असतं. तिच्या ओरडण्यामध्ये देखील काळजी असते. आपल्या मुलाने चांगलं वागावं आणि चुक करू नये म्हणून ती चिडते.त्यामुळे आई ही जितकी प्रेमळ तितकीच कठोर देखील असते.जेव्हा मी छोट्या पडद्यावर अथर्वची आई साकारते तेव्हा मी नेहमी माझ्या आईला डोळ्यासमोर आणते आणि तिच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करते." अनिता दाते म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या राधिकाने एका आदर्श आईची छाप सर्वांच्या मनावर पाडली आहे.

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं; असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली, माझ्या नवऱ्याची बायको, ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, स्वावलंबी, राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी नखरेल, शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला, बिचारा, गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय एक नव वळण घेतले आहे.

Web Title: So Radhika is the ideal mother of small screen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.