So the photos that Kavita Kaushik shares, the netshells also give feedback | म्हणून कविता कौशिक शेअर करते असे फोटो,तर नेटीझन्सही दितायेत अशा प्रतिक्रीया

रोनित आणि कविता अनेक महिन्यांपासून नात्यात होते. त्यांनी धुमधडाक्यात लग्न न करता केदारनाथमधील शिव पार्वती मंदिरात जाऊन अगदी साधेपणाने लग्न केले.दोघांनी मागच्यावर्षी 26 जानेवारीला लग्न केले होते.कविता कौशिक सध्या नवरा रोनित विश्वाससोबत गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय.ती गोव्याच्या समुद्रामध्ये पिंक कलरच्या बिकिनीमध्ये मस्ती करताना दिसतील.तिने हॉलिडे एन्जॉय करताना काही फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.कविता कौशिक सध्या तिच्या आयुष्यातील हे नवीन क्षण खूपच चांगल्याप्रकारे एन्जॉय करत आहे.कविताने रोनितसोबतचे काही खूपच क्यूट फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघे खूपच खूश दिसत आहेत. कविताने हे फोटो शेअर करण्यासोबतच कॅप्शनमध्ये हार्टचा स्माइलीदेखील वापरला आहे.तिच्या या फोटोंना अनेक लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.


एफआयआर फेम दबंग पोलीस अधिकारी म्हणजेच चंद्रमुखी चौटाला  म्हणूनही कविता कौशिक ओळखली जाते.लग्नाआधी कविता अभिनेता नवाब शहासह अफेअर होते.गेल्या पाच वर्षांपासून या दोघांचं अफेअर सुरु होतं. कविता आणि नवाब यांनी लग्न बंधनात अडकण्याचाही निर्णयही घेतला होता. मात्र काही कारणांमुळे कविताच्या आईवडिलांनी या लग्नाला नकार दिला होता. यामागं धर्माचं कारण असल्याचं बोललं गेलं.आपल्या आईवडिलांना नाराज करुन लग्न करणार नसल्याचं कवितानेही स्पष्ट केले होते.

कविता सध्या पंजाबी चित्रपटांमध्ये बिझी आहे.तिला पंजाबी गायक तथा अभिनेता गुरुदास मान याचा चित्रपट मिळाला आहे. या अगोदरही कविताने एक पंजाबी चित्रपट केला आहे.चित्रपटाचे नाव ‘ननकाना’ असे ठेवण्यात आले असून, कविताने या चित्रपटाविषयी इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘अनोख्या प्रेमाची अनोखी कथा’. या चित्रपटाला गुरदास मानची पत्नी मंजित मान दिग्दर्शित करीत आहे. हा चित्रपट वैशाखीच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच १३ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. 
Web Title: So the photos that Kavita Kaushik shares, the netshells also give feedback
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.