So, this actor is Hrithik Roshan's dream of popularity! | म्हणून 'या' अभिनेत्याचे आहे हृतिक रोशनसारखं लोकप्रियता मिळवण्याचे स्वप्न!

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत कानपूरमध्ये राहणा-या 21 वर्षांच्या देखण्या राधेची भूमिका गौरव सरीन रंगवीत आहे. ब-याच अभिनेत्यांप्रमाणे गौरवचा आदर्श अभिनेताही हृतिक रोशन हाच आहे.हृतिक रोशन दिसायला देखणा तर आहेच, पण तो तरतरीन आणि दणकट देहयष्टीही लाभली असून प्रेक्षक त्याच्या या आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडतात.आपल्या या आवडत्या हिरोची प्रशंसा करताना गौरव म्हणाला, “मला नेहमीच आपण हृतिक रोशनप्रमाणे हिरो व्हावं, असं वाटत असे. मी लहान असल्यापासून त्याच्या अभिनय पाहात आलो आहे.मी त्याच्यासारखे कपडे घालतो आणि मी पूर्वी माझी केशभूषाही त्याच्यासारखीच ठेवली होती.तो उत्कृष्ट अभिनेता असून भविष्यात मलाही त्याच्याइतकाच उत्कृष्ट अभिनेता व्हायचं आहे.”
‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेत लवकरच तो मध्यवर्ती भूमिकेत झळकणार असल्याने गौरव या मालिकेबद्दल खूप उत्सुक आहे. ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत तो राधे या कोवळ्या तरुणाची भूमिका साकारत असून या मालिकेत राधेचे एकच लक्ष्य असते- ते म्हणजे लग्न करणे.

 लग्नानंतर अगदी रोमँटिक जीवन जगण्याची त्याची कल्पना असते.तो स्वत: नववी इयत्ता नापास असला आणि त्याच्या जीवनात कोणतेही ध्येय व आकांक्षा नसल्या, तरी आपल्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची त्याचा निर्धार असतो.त्याच्या कुटुंबात तो सर्वात लहान असल्याने सर्वांचा लाडका असतो.पण कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्याला काही स्थान नसते. पण त्याचा निरागस आणि आकर्षक स्वभाव सर्वांचे मन जिंकून घेत असे.त्याला नृत्य करायला फार आवडतं.1990 च्या दशकातील गाण्यांचा तो चाहता असतो.आपल्याला जीवनात सर्व काही मिळाले आहे,अशी त्याची भावना असते- उत्तम कुटुंबीय, उत्तम मित्र, सुखाचे जीवन आणि आता त्याला त्याची पत्नी मिळाली की त्याचे जीवन परिपूर्ण होईल, अशी त्याची समजूत असते.

'कृष्णा चली लंडन' या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये राधे आपली स्वत:ची माहिती देत असून त्याचा मित्र साजन ती मोबाईलवर रेकॉर्ड करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी राधेची ओळख जाणून घेण्यासाठी त्याला काही प्रश्न विचारले जात आहेत.यात त्याचे ‘नाव’, ‘काम’, ‘आपल्या पायावर उभा आहे की नाही?’ यासारख्या प्रश्नांची उत्तरे तो आपल्याला देताना दिसत आहे. या प्रोमोच्या अखेरीस राधे आपली ही ओळख करून देणारा व्हिडिओ अनेक मुलींना पाठवतो आणि त्यासोबत एक प्रश्नही विचारतो, “है कोई नजर में?” कृष्णा चली लंडन या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काहीच दिवस झाले असले तरी या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Web Title: So, this actor is Hrithik Roshan's dream of popularity!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.