Sneha Waghale came to know about herself because of Chandrashekhar's series? | 'चंद्रशेखर'च्या मालिकेमुळे स्नेहा वाघले स्वतःविषयी समजली ही माहिती?

चित्रपट किंवा टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात वरच्या स्तरावर जाण्यासाठी सर्वच कलाकार धडपड करीत असतात.पण त्यासाठी त्यांना तीव्र स्पर्धेशी सामना करावा लागतो. ही स्पर्धा कोणत्याही कलाकाराशी असू शकते, मग त्याचे वय आणि अनुभव काही का असेना! स्टार भारतवरील चंद्रशेखर या मालिकेतील आठ वर्षांच्या बालकलाकाराची स्पर्धा या
मालिकेतील अन्य कलाकारांना जाणवू लागली आहे.मालिकेत त्याच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा वाघचे अयान झुबेर रेहमानीशी अतिशय स्नेहाचे संबंध असले, तरी तिला त्याची स्पर्धा जाणवत आहे.'चंद्रशेखर' या मालिकेचे कथानक अतिशय सशक्त असून त्याद्वारे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक तळपते व्यक्तिमत्त्व
पुन्हा एकदा जनतेपुढे येणार आहे.मालिकेत अन्य भूमिकांमध्ये नामवंत आणि कसलेले कलाकार आहेत.'चंद्रशेखर आझाद' या क्रांतिकारकाच्या बालपणीच्या भूमिकेत अयान झुबेर रेहमानी झळकणार आहे.त्याची आई जाग्राणीदेवी आणि वडील सीताराम तिवारी यांच्या भूमिका अनुक्रमे स्नेहा वाघ आणि सत्यजित शर्मा उभ्या करणार आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिकेत चंद्रशेखर यांच्या आईची भूमिका रंगविणारी अभिनेत्री स्नेहा वाघ हिला सेटवर स्वत:बद्दल कमीपणा वाटू लागला आहे. स्नेहा वाघने आतापर्यंत अनेक मालिकांतून आईची भूमिका प्रभावीपणे रंगविली असली,तरी या मालिकेत सर्व कथा बालकलाकारांभोवती असल्याने तिच्या मनात आपण इतके महत्त्वाचे नाही.अशी
भावना निर्माण झाली आहे.

ज्योती, एक वीर की अरदस- वीरा आणि शेर-ए- पंजाब :महाराजा रणजितसिंग या मालिकांमध्ये नायकांच्या मातेची भूमिका साकारल्यावर स्नेहा वाघ आता पुन्हा एकदा आईच्या भूमिकेत दिसणार आहे.‘स्टार भारत’वरील ‘चंद्रशेखर’या आगामी भव्य आणि महत्त्वपूर्ण मालिकेत ती 'चंद्रशेखर' यांची माता जगरानी तिवारी यांची भूमिका उभी साकारणार आहे.'चंद्रशेखर' नावाच्या केवळ आठ वर्षांच्या एक अतिशय शूर आणि निर्भय मुलाची कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे.चंद्रशेखरमध्ये ही निर्भयतेची आणि शौर्याची भावना निर्माण करणार्‍या आईच्या भूमिकेत स्नेहा वाघ दिसेल.स्नेहा वाघ म्हणाली, “चंद्रशेखरचं जीवनात एकाच व्यक्तीवर प्रेम असतं- ते म्हणजे त्याची आई. मी जगरानी तिवारी या त्याच्या आईच्या भूमिकेत असेन. या मालिकेचा आतापर्यंतचा अनुभव हा फारच अदभुत आहे.तो काळ वीज नव्हती तेव्हाचा आहे.तेव्हा समाजावर अंधश्रध्देचा पूर्ण पगडा होता आणि समाजात महिलांना काही किंमत नव्हती.त्या पुरुषांच्या दासी होत्या. त्याची पटकथा ही एकदमच वास्तव आहे.मालिकेची भाषा, संवाद, पटकथा हे सारं इतकं वास्तव आणि सच्चं आहे की आपण मुद्दाम काही संवाद बोलत आहोत, असं वाटतच नाही.ती दैनंदिन जीवनातील बातचीतच वाटते.”

Web Title: Sneha Waghale came to know about herself because of Chandrashekhar's series?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.