स्नेहा वाघने घेतली या दृष्यासाठी तब्बल 10 तास मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 07:15 AM2019-02-16T07:15:00+5:302019-02-16T07:15:00+5:30

स्नेहा कडक उन्हात इतर काही अडचणींसाहित उभी राहिली. हा प्रसंग खूपच अवघड होता आणि त्यामुळे तिच्या हातावर लाल रंगाचे ओरखडे उमटले.

Sneha took 10 hours hard work for the seen | स्नेहा वाघने घेतली या दृष्यासाठी तब्बल 10 तास मेहनत

स्नेहा वाघने घेतली या दृष्यासाठी तब्बल 10 तास मेहनत

googlenewsNext
ठळक मुद्देस्नेहा या मालिकेत मुराची भूमिका साकारतेयस्नेहाला दहाहून अधिक तास हवेत लटकत ठेवण्यात आलं होतं

अनेक वर्षं असं दिसून आलं आहे की एखाद्या आव्हानात्मक भूमिकेच्या शुटिंगच्या अगोदर कलाकार कठीण प्रशिक्षण घेतात आणि गेल्या काही काळात धाडसी दृश्यांसाठी ते दुसऱ्या कोणाचा (बॉडी डबल) वापर करण्याऐवजी कोणताही धोका पत्करून स्वतः ते प्रसंग निभावतात. असंच एक उदाहरण आहे अभिनेत्री स्नेहा वाघचं जी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील 'चंद्रगुप्त मौर्य' ह्या मालिकेत मुराची भूमिका करत आहे.

नुकतंच स्नेहाने अशा प्रसंगाचं शूटिंग केलं ज्यामध्ये तिला दहाहून अधिक तास हवेत लटकत ठेवण्यात आलं होतं. आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या ह्या प्रसंगात दाखवलं आहे की धनानंदला समजतं की त्याच्या खजिन्याची चोरी झाली आहे आणि तो त्याचा आरोप मुरावर ठेवतो. नंतर तो मुराचे हात बांधून तिला हवेत लटकवत ठेवण्याची शिक्षा सगळ्या लोकांसमोर करावी असा आदेश देतो. हा प्रसंग चित्रित करण्यासाठी दोन दिवस लागले आणि स्नेहा कडक उन्हात इतर काही अडचणींसाहित उभी राहिली. हा प्रसंग खूपच अवघड होता आणि त्यामुळे तिच्या हातावर लाल रंगाचे ओरखडे उमटले.

ह्या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली, "हा खूपच अवघड क्रम होता ज्यामध्ये तुम्ही बघाल की मला हवेत लटकवलं आहे आणि माझे हात डोक्याच्या वर बांधलेले आहेत. गोष्टीप्रमाणे धनानंद हा मुराला चोरी केल्याबद्दल शिक्षा करत आहे. निर्मात्यांनी मला ह्यासाठी बॉडी डबल वापरायला सांगितलं कारण त्याचं शूटिंग २ दिवस चालणार होतं. मी ते एक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि म्हटलं मी करीन. मला वाटतं हा प्रसंग पूर्ण व्हायला दहा तासांहून अधिक वेळ लागला. तुमचे हात खांबाला बांधून असं लटकून राहणं खरंच खूप अवघड आहे. बॉडी डबल न वापरता हा प्रसंग चित्रित केल्यामुळे हे शूटिंग पूर्ण झाल्यावर सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं. माझ्या कामासाठी मी माझ्या परीने आणि शक्य ते सर्व काही करेन."

असा एक अवघड प्रसंग स्वतः चित्रित करण्याचं आव्हान स्वीकारून ते पूर्ण करणं हे खरंच कौतुकास्पद आहे.

Web Title: Sneha took 10 hours hard work for the seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.