On the small screen, 'What is called a relation' is a series of new history, read more detailed | छोट्या पडद्यावर 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने रचला नवा इतिहास,वाचा सविस्तर

हिंदी मालिकांमध्ये सध्या वगेवगळ्या मालिका सुरू आहेत.त्यात जुन्या मालिका बंद होत त्या जागी नवीन मालिकांनी छोट्या पडद्यावर एंट्री घेत रसिकांचे मनोरंजन करत आहेत.नवीन मालिकांच्या भाऊगर्दीत एकच हिंदी मालिका आहे जीला रिप्लेस करणे नवीन मालिकांनाही शक्य झाले नाही. होय,ती मालिका म्हणजे 'ये रिश्ता क्या कहलाता है' गेल्या 8 वर्षापासून ही मालिका रसिकांचे तुफान मनोरंजन करत आहे.मालिकेची कथा आणि मालिकेची स्टारकास्ट यामुळे या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली होती.आता या मालिकेने तब्बल 2500 एपिसोडस पूर्ण करत हिंदी मालिकांमध्ये सगळ्यांत सर्वाधिक काळ सुरू असणारी मालिका ठरली आहे. 12 जानेवारी 2009 ला 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेची सुरूवात झाली होती.बघता बघता या मालिकेने 2500 एपिसोडस पल्ला गाठला आहे.आजवर कोणत्याच मालिकेला इतका मोठा पल्ला गाठणे शक्य झालेले नाहीय.यापूर्वी 'क्योंकी सास भी कभी बहुँ थी' मालिका सर्वाधिक काळ सुरू असणारी मालिका ठरली होती.1833 एपिसोडस पूर्ण केल्यानंतर या मालिकेने रसिकांना अलविदा म्हटले होते.त्यानंतर 'साथ निभाना साथिया' आणि कलर्स चॅनलवरील 'बालिका वधु'मालिकेने 2000 एपिसोड पूर्ण करत रसिकांचा निरोप घेतला होता. त्या मालिकांच्या जागी नवीन मालिकांची एंट्री झाली होती. मात्र 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेबाबत असे झाले नाही. 'क्योंकी सास भी कभी बहुँ थी' मालिकेचा रेकॉर्ड ब्रेक करत या मालिकेने 2500 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. रसिकांच्या पसंतीमुळेच ही मालिका आजही रसिकांची फेव्हरेट बनली आहे.त्यामुळे 'ये रिश्ता क्या कहलाता है'मालिकेची आता 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मालिकसह स्पर्धा असल्याचे पाहायला मिळतंय. तारक मेहतान या या मालिकेनेही 2314 एपिसोड पूर्ण करत सगळ्यात फेव्हरेट कॉमेडी शो ठरला आहे.

Also Read:या मालिकेच्या सेटवर जुळतात लग्न,आणखी एक टीव्ही कपल प्रेमात!

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील प्रत्येक कलाकारांना रसिकांनी  भरभरून प्रेम दिले.अक्षरा नैतिक,नक्ष नायरा हे जणून प्रत्येकाच्या घरातलेच एक सदस्य बनले.या भूमिका साकारणा-या कलाकारांनी याच मालिकेमुळे अमाप लोकप्रियता मिळवली.मालिकेत येणारी नवनवीन रंजक वळणांमुळे रसिकही मालिकेशी खिळुन राहिला.सध्या मालिकेत नक्ष आणि कीर्तिचे लग्न झाल्याचे दाखवण्यात आले आहे.या ट्रॅकनंतर आणखीन एक धक्कादायक ट्रॅक रसिकांना पाहायला मिळणार आहे.ते म्हणजे मालिकेतील लव्हबर्डस नायरा आणि कार्तिक जे एकमेकांच्या प्रेमात आकंत बुडाले आहेत.हेच लव्हबर्ड आता वेगळे होणार असे दाखवण्यात येणार आहे.त्यामुळे मालिकेतील प्रत्येक रंजक कथानकमुळे ही मालिका आजवरची सगळ्यात सुपरहिट आणि सर्वाधिक काळ चालणारी मालिका ठरली आहे.
Web Title: On the small screen, 'What is called a relation' is a series of new history, read more detailed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.