Sister-in-law Shilpa Shinde's Hindi, English-language ignorance says, 'The right hold!' | भाभीजी शिल्पा शिंदेचे हिंदी, इंग्रजी भाषेचे अज्ञान बघून चाहत्यांनी म्हटले ‘सही पकडे हैं’!

‘बिग बॉस सीजन ११’ची स्पर्धक शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यातील वाद असा काही रंगात आला की, दोघांनीही एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली. विकासने तर आया-बहिणीवरून शिवीगाळ केल्याने या दोघांमधील दुश्मनीने आता उच्चांक गाठला आहे. मात्र मजेशीर बाब हीदेखील आहे की, जेव्हा शिल्पा अडचणीत असते, तेव्हा विकासच तिच्या मदतीला धावून जातो. होय, नुकतेच बिग बॉसच्या घरात असे काही घडले की, विकासच तिच्या मदतीला धावून गेला. 

वास्तविक बिग बॉसकडून लक्झरी बजेट टास्कच्या डिटेल्स वाचण्याची जबाबदारी शिल्पाला दिली गेली. जेव्हा शिल्पा हिंदीत लिहिलेला बिग बॉसचा हा संदेश वाचत होती, तेव्हा तिला वाचताना खूपच अडचण येत होती. त्यामुळे ती प्रत्येक शब्द अतिशय लक्ष देऊन वाचत होती. काही वाक्य वाचल्यानंतर शिल्पा ‘बाड’ या शब्दावर अडकली. बरेचसे प्रयत्न करूनही तिला हा शब्द वाचता आला नाही. अखेर विकासने पुढे येऊन शिल्पाला या शब्दाचा खरा उच्चार सांगितला. त्यानंतर शिल्पाने दिलेला सर्व संदेश वाचला. एवढेच काय तर शिल्पाने जेव्हा इंग्रजीतील एक वाक्य वाचले तेव्हा ‘गाइड’ या शब्दाचा अर्थ ‘ग्लूड’ असा वाचला. त्यानंतर बेनाफ्शाने हाच संदेश पुन्हा वाचण्यास सुरुवात केली. मात्र ही बाब शिल्पाला चांगलीच खटकली. पुढे त्यावरून दोघींमध्ये जोरदार भांडणही झाले. भाभीजी या नावाने प्रसिद्ध असलेल्या शिल्पा शिंदेची हिंदी आणि इंग्रजी भाषेविषयीची व्यथा बघून तिच्या चाहत्यांनी ‘सही पकडे है’ असे म्हटले नसेल तरच नवल. 
Web Title: Sister-in-law Shilpa Shinde's Hindi, English-language ignorance says, 'The right hold!'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.